
रायगड | Raigad
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कुटुंबीयांच्या कथित 19 बंगलो घोटाळाप्रकरणात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे...
तत्कालीन ग्रामसेवक विनोद मिंडे, देवंगणा वेटकोळी, वेदिका म्हात्रे, तत्कालीन सरपंच गोविंद वाघमारे, रेश्मा मिसाळ, रिमा पिटकर, प्रशांत मिसाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तत्कालीन ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी वेळोवेळी शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने कर आकारणी प्रक्रियेचा जाणीवपुर्वक अंमल केला नाही. तसेच ग्रामपंचायतीच्या मिळकत नोंदवहीमध्ये बेकायदेशीर नोंदी घेऊन खोटे दस्ताऐवज तयार केल्या प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुरुडच्या ग्रामविकास अधिकारी संगिता भांगरे यांनी हा गुन्हा नोंदवला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले.
या प्रकरणात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता गुन्हा दाखल झाल्याने उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे.