आठवडे बाजार सुरू करण्याचा प्रस्ताव पाठवणार- जिल्हाधिकारी मांढरे

आठवडे बाजार सुरू करण्याचा प्रस्ताव पाठवणार- जिल्हाधिकारी मांढरे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील Nashik District जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी असलेले विविध निर्बंध हटविण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार weekly Bazaar सुरू करण्याचा प्रस्ताव राज्य आपत्ती नियंत्रण प्राधिकरणास लगेच आजच पाठवून त्यास मान्यता घेतली जाईल. असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे collector Suraj Mandhare यांनी सांगितले .

नवरात्रोतसवाच्या कालावधीत मंदिर परिसरात गर्दिच्या ठिकाणी लसीकरणाची मोहिम हाती घेण्यात येणार असून आठवडे बाजार सुरू झाल्यानंतर तेथेही अशा प्रकारची मोहीम सुरू करण्यात येणार आहे.

लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी या मोहिमेत सहभाग नोंदविल्यास जिल्ह्यातील लसीकणची टक्केवारी वाढून तिसर्‍या लाटेपासून जिल्ह्याचा बचाव करण्यासाठी शासन-प्रशासनास मदत होईल असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.