Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यासंजय राऊतांना जेल की बेल?; आज निर्णय

संजय राऊतांना जेल की बेल?; आज निर्णय

मुंबई | Mumbai

शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची ईडी कोठडी (ED Custody) आज संपणार आहे. त्यामुळे संजय राऊतांना जामीन मिळणार की पुन्हा कोठडीत मुक्काम वाढवणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे…

- Advertisement -

पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी (Patra Chawl Scam) ईडी (ED) संजय राऊत (Sanjay Raut) यांची कोठडी वाढवून देण्याची मागणी करणार आहे. तर राऊत यांचे वकील अर्थातच आधी न्यायालयीन कोठडी आणि नंतर जामीनाची मागणी करतील. मात्र जामीन अर्जावर आज लगेच फैसला होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, संजय राऊत यांच्या कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने काल मुंबईत दोन ठिकाणी छापे मारले आहेत. यात काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

संजय राऊत यांनी अलिबागमधील 10 फ्लॅट्स खरेदीसाठी 3 कोटी रुपये रोख दिल्याचा दावा ईडीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. एचडीआयएलच्या माजी अकाउंटंटचा जबाबही नोंदवण्यात आला आहे.

राऊतांच्या खात्यात ट्रान्सफर झालेल्या पैशांव्यतिरिक्त प्रवीण राऊत यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रोकड मिळाली होती. हा पैसा अलिबाग आणि मुंबईमधील फ्लॅट खरेदीसाठी वापरण्यात आल्याचा दावा ईडीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या