एकनाथ खडसे पुन्हा आक्रमक, त्या सीडीसंदर्भात म्हणाले...

एकनाथ खडसे पुन्हा आक्रमक, त्या सीडीसंदर्भात म्हणाले...
एकनाथ खडसेराजकीय

'चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांचा मी आभारी आहे की, त्यांनी मान्य केलं आहे की, ईडीची (ed) चौकशी त्यांनी लावण्याची कबुली दिली. तुम्ही ईडी (ed)लावली तर मी सीडी (cd) लावेल हे मी बोललो होतो. यासंदर्भात सीडीची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांचा अहवाल आल्यावर ते मी जाहीर करेल, असा थेट इशारा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी भाजपला दिला आहे.

एकनाथ खडसे
बॉलीवूड अभिनेत्यांच्या बॉडीगार्डचे पगार ऐकून थक्क व्हाल ?

मुक्ताईनगरात माध्यमांशी बोलतांना खडसे म्हणो, जे भ्रष्टाचार करतात, गैरव्यवहार करतात त्या लोकांवर आम्ही कारवाई करतो, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यामुळे मला अपेक्षा आहे की दादांनी त्यांच्या शेजारी बसणाऱ्या लोकांची चौकशी करावी. त्यांनी माझी ईडीची चौकशी लावली हे मान्य केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. विधानसभेत मी वारंवार विचारलं माझा दोष काय आहे ते सांगा. आता ईडीने चौकशी लावली. ती कोर्टात काय व्हायचं ते होईल, असंही त्यांनी सांगितलं.

आरोपात तथ्य नाहीच...

'गेल्या 40 वर्षांपासून राजकीय जिवनात काम करतोय, या काळात माझ्यावर एकही आक्षेप नाही. माझ्यावर जे काही जमिनीचे आरोप करण्यात आले आहे. ते हेतूपुरस्कृत करण्यात आले आहे. त्याच्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. जमिनी संदर्भात माझावर हेतू पुरस्कृत आरोप करण्यात आले आहे. जमिनी व्यवहाराची पूर्ण चौकशी झाली आहे. चौकशी होवून याचा अहवाल पुण्याच्या कोर्टात गेलेला आहे. अहवालात तथ्य नाही असा स्पष्टीकरण एसीबीने दिले असताना तरी त्यावर ईडीची चौकशी सुरू आहे.

काय म्हणाले होते खडसे?

खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी भाषण करताना त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन, असा इशारा दिला होता. मला एकदा जयंत पाटील यांनी विचारलं की तुम्ही राष्ट्रवादीत येणार का? तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही घेतलं तर येईन. तर त्यावेळी जयंत पाटील म्हणाले, तुम्ही आलात तर ते तुमच्यामागे ईडी लावतील, असे आमचे गमतीत बोलणं सुरु होतं. पण आता सांगतो जर त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावीन, अशी इशारा एकनाथ खडसे यांनी दिला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com