Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याओझर विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळणार?

ओझर विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळणार?

देवळाली कॅम्प । वार्ताहर Nashik

ओझर विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाल्याची सुखद बातमी लवकरच नाशिककरांना मिळणार आहे.

- Advertisement -

विमानतळाशी संबंधित विविध विभागांच्या उच्च पदस्थ अधिकार्‍यांच्या पथकाने आज ओझर विमानतळावरील पायाभूत सुविधांची पाहणी करुन विमानतळ प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना केल्या.या हालचालींवरून खासदार हेमंत गोडसे यांच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळू लागले आहे असे दिसते.

अधिकार्‍यांच्या पाहणी दौर्‍यामुळे लवकरच ओझर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा प्राप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसे झाल्यास देश-विदेशातील विमाने ओझर विमानतळावरुन टेक अप – लॅडिंग होणार आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

ओझर विमानतळाला गेल्या दोन महिन्यांपूर्वी इंटरनॅशनल कुरिअर हब सेवेला मान्यता मिळाली. या विमानतळाला आंतराराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा मिळावा, यासाठी गोडसे यांनी प्रयत्न सुरु केले होते. गेल्या 9 सप्टेंबरला दिल्लीतील मंत्रालयात विशेष बैठकही झाली.

त्यावेळी गोडसे यांनी ओझर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देणे किती महत्वाचे आहे, हे अधिकार्‍यांच्या लक्षात आणून दिले. गोडसे यांच्या मागणीची दखल घेवून आज विमानतळाशी संलंग्न असलेल्या विविध विभागाच्या अधिकार्‍यांनी ओझरला भेट देवून पाहणी केली.

आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्यासाठी गरजेच्या असलेल्या विविध पायाभूत सुविधांबाबत अधिकार्‍यांनी विमानतळ प्रशासनाच्या अधिकार्‍यांना सूचना केल्या. त्यांची पूर्तता झाल्यानंतर लवकरच प्रशासकीय मान्यतेनंतर ओझर येथून आंतरराष्ट्रीय विमानांचे टेकअप आणि लॅडिंग होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

या पाहणी दौर्‍यावेळी खासदार हेमंत गोडसे, पथकाचे ब्युरो ऑफ इमिग्रीनेशनचे जॉईट डायरेक्टर पाठक, कस्टमचे चौधरी, एन. आय. सी. चे. मते, हॅलकॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर सेन यांच्यासह एच. ए. एल. विभागाचे उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते.

ओझरहून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु व्हावी, अशी जनतेची मागणी होती. आंतरराष्ट्रीय कुरिअर हबला मिळालेल्या मान्यतेमुळे देश-विदेशातून येणार्‍या पार्सलचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच आंतरराष्ट्रीय विमानांची ये-जा सुरु होणार असल्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला याचा मोठा फायदा होईल.

– खासदार हेमंत गोडसे

- Advertisment -

ताज्या बातम्या