तुमच्या सत्तेचा ढाचा पाडणार: फडणवीस

तुमच्या सत्तेचा ढाचा पाडणार: फडणवीस

मुंबई । वृत्तसंस्था Mumbai

मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांनी काल भाजप आणि देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis -BJP ) यांच्यावर केलेल्या टिकेला भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत जोरदार प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरेंना माझ्यावर केवढा विश्वास आहे, म्हणाले बाबरीवर पाय टाकला की पडेल म्हणे. खरेच आहे. आज माझे वजन 102 किलो आहे. बाबरीवेळी माझे वजन 128 किलो होते. माझ्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही माझे वजन कमी करू शकणार नाही.तुमच्या सत्तेच्या ढाच्याला पडल्याशिवाय शांत बसणार नाही, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर शरसंधान साधले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे हिंदी भाषिक संकल्प सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर घणाघाती टीका केली. वाघाचे फोटो काढले म्हणून कुणाला वाघ होता येत नाही. त्यासाठी निधड्या छातीनं आव्हानांचा सामना करावा लागतो. नुसती फोटोग्राफी करून वाघ होता येत नाही, असा टोला फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांनी नेमका कुठला सामना केला, कोणत्या आंदोलनात होते, कुठल्या संघर्षात होते, असा सवालही त्यांना फडणवीस यांनी विचारला आहे. तसेच करोना काळाच्या संघर्षात मैदानात कोण होते? उद्धव ठाकरे केवळ फेसबूक लाईव्हवर होते, आम्ही मैदानात अलाईव्ह होतो, असेही त्यांनी म्हटले.

कालच्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे भोळे होते. पण मी भोळा नाही धूर्त आहे. यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हो वाघ भोळाच असतो. बाळासाहेब ठाकरे भोळे होते. पण धूर्त कोण असते, हे तुम्हाला माहीत आहे. मी त्या प्राण्याचे नाव घेणार नाही. कारण त्यांनी पातळी सोडली म्हणून मला पातळी सोडायची नाही, अशा शब्दांत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

हो, बाळासाहेब ठाकरे वाघ होतेच पण आता देशात केवळ एकच वाघ आहे. आणि त्या वाघाचे नाव म्हणजे नरेंद्र मोदी आहे. शिवसेनेच्या म्हणण्यानुसार मंदिरातील घंटा वाजणारा हिंदू नको, तर आतंकवाद्याला बडवणारा हिंदू पाहिजे. हो आतंकवाद्याला बडणारा हिंदू नरेंद्र मोदी आहे. जवानावर हल्ला झाल्यानंतर सीमेपार जाऊन सर्जीकल स्टाईल करणारा हिंदू नरेंद्र मोदी आहे. त्यांनी सीमेमध्ये घुसून दहशतवाद्यांना मारले.

मुंबई वेगळी करायची पण..

मुंबई महाराष्ट्रापासून कोणीही वेगळी करू शकणार नाही.पण आम्हाला मुंबई तुमच्या भ्रष्टाचारापासून वेगळी करायची आहे. महाराष्ट्राला भूषण वाटेल अशी मुंबई घडवायची आहे, असे सांगतानाच मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकणार आहे, पण तो भगवा भारतीय जनता पक्षाचा असेल, असे सांगत त्यांनी आगामी पालिका निवडणुकीत भाजपला विजयी करण्यासाठी साथ द्या, असे आवाहन मुंबईकरांना केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com