Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याआता निवडणूक लढवणार नाही

आता निवडणूक लढवणार नाही

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पंचवीस वर्ष आपण भाजपकडून ( BJP ) महापालिकेची निवडणूक ( NMC Elections ) लढवून विजय मिळवला. सभागृहात ठळकपणे कामकाज केल्याने अडीच वर्षांपूर्वी मला महापौरपद मिळाले. माझ्या कारकिर्दीत सर्वच पक्षाच्या सदस्यांनी अधिकारी, सेवक यांनी मला कामकाजात चांगलीच साथ दिली. यापुढे आपण महापालिकेची निवडणूक लढविणार नसून पक्षाचे काम करणार असल्याचा निर्धार महापौर सतीश कुलकर्णी ( Mayor- Satish Kulkarni ) यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

चालू पंचवार्षिकची महासभा ही अंतिम महासभा झाली.यावेळी महापौर सतीश कुलकर्णी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,मला मनपा कामकाजात सर्वच पक्षाचे गटनेते, सभागृहनेते, विरोधीपक्षनेते, महापालिकेचे आयुक्त, अधिकारी-कर्मचारी या सर्वांनीच कामकाजात चांगले सहकार्य केले. शहराच्या दृष्टिकोनातून व शहर विकासाचे ध्येय सदैव समोर ठेवून मी जे काही चांगले करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला.

अडीच वर्षाच्या काळात तसेच गेल्या पंचवीस वर्षाचा अनुभव लक्षात घेता मी माझ्या काळात शहर विकासाच्या अनेक योजनांना चालना दिली. महापालिकेला उत्पन्नाची आवश्यकता असून उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्यासाठी भरीव काम केले.त्यातूनच आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्क, नमानी गोदा प्रकल्प अशा विविध योजना आणल्या.या सर्व योजना कार्यान्वित झाल्यास पुढील काही वर्षात महापालिकेच्या तिजोरीत दीड हजार कोटी रुपयापर्यंत महसुलात वाढ होईल असे ते म्हणाले.

शहर विकासाच्या दृष्टीने काम करीत असताना सद्यस्थितीत नाशिक मेट्रोकडे वाटचाल करीत आहे. पुढील काही वर्षात वाटचाल होईल त्यादृष्टीने निओ मेट्रोसाठीही आपण विशेष प्रयत्न केले तसेच द्वारका येथील उड्डाणपूल पुलाचे काम लवकरच सुरू होईल, शहरातून चेन्नई -सुरत महामार्ग, समृद्धी महामार्ग जाणार आहेत.त्या महामार्गाचाही विकासाच्या दृष्टीने निश्चितच फायदा होणार आहे.

शहराच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन विद्युत,पाणीपुरवठा स्वच्छता, सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता ही कामे माझ्या कारकिर्दीत मी हाती घेतली. शहर विकासाची कामे करताना कुठल्याही पक्षाचा भेदभाव न करता सर्वमान्य असे निर्णय घेऊन कामकाज केले. महापालिकेत नोकर भरती होणे अत्यंत आवश्यक असून त्या दृष्टीने आपण शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा केला, असेही त्यांनी सांगितले.

माझा मुलगा किंवा मुलगी त्यांची इच्छा असेल तर ते निवडणूक लढवतील. या बाबत आपण कुणाला तसेच पक्षाला काही सांगणार नाही. आपली पक्षनिष्ठा कायम असून पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडील. पक्ष संघटनेसाठी काम करीत राहणार.

सतिश कुलकर्णी, महापौर Satish Kulkarni, Mayor

- Advertisment -

ताज्या बातम्या