स्थानिक निवडणुकांसाठी शक्य तिथे आघाडी करणार : राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष आ. जयंत पाटील

jalgaon-digital
1 Min Read

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

आगामी काळात होणार्‍या जिल्हा परिषद (Zilla Parishad,), पंचायत समिती (Panchayat Samiti) आणि नगरपरिषदांच्या (Municipal Councils) निवडणुकांसाठी (Election) शक्य असेल त्याठिकाणी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून निवडणुक लढविली जाईल अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष आ. जयंत पाटील (Provincial President of NCP. Jayant Patil) यांनी आज पत्रकारांशी बोलतांना दिली.

राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष आ. जयंत पाटील शनिवारी जळगाव दौर्‍यावर होते. या दौर्‍यात त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद या निवडणुकांसाठी जिल्हा बैठक घेतली. या बैठकीत आ. जयंत पाटील यांच्याकडे तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मतदारसंघातील पक्षांतर्गत व्यथा मांडल्या. दरम्यान बैठकीनंतर आ. जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आघाडीच्या प्रश्नासंदर्भात आ. जयंत पाटील यांनी सांगितले की, राज्यस्तरावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडीची संयुक्त बैठक झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ज्याठिकाणी पक्षाला शक्य आहे त्याठिकाणी आघाडी केली जाईल असे त्यांनी सांगितले. तसेच शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत युती केल्याचे मी बातम्यांमध्ये बघीतले.

अधिक याबाबत काहि बोलता येणार नाही असेही ते म्हणाले. आजच्या जिल्हा बैठकीत कार्यकर्त्यांनी ज्या तक्रारी मांडल्या त्यात तथ्य आहे. अडीच वर्षाच्या काळात राज्यात प्रत्येक ठिकाणी निधी देता आला नाही. तीन पक्षाचे सरकार असल्यामुळे काही ठिकाणी तडजोडी कराव्या लागल्या. मात्र पुढच्या काळात कार्यकर्ता आणि पक्ष संघटन भक्कम करण्यावर लक्ष दिले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *