विजांंचा कडकडाट कळणार अर्धा तास आधी

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे दामिनी अ‍ॅप विकसित
विजांंचा कडकडाट कळणार अर्धा तास आधी

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

शेतकरी (farmers), नागरिकांना वादळी पाऊस (Heavy rain), विजांच्या कडकडाटाचे अचूक अंदाज आधी मिळण्यासाठी दामिनी अ‍ॅप (Damini App) कार्यान्वीत केले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील (nashik district) मान्सून पूर्व पावसात (pre-monsoon rains) जिवीतहानी टाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

विजांसह (lightning) होणार्‍या पावसाचे पुर्वानुमान समजावे, यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (Indian Meteorological Department) पुणे विभागाने (Pune Division) गेल्यावर्षी हे दामिनी मोबाइल अ‍ॅप (Damini mobile app) विकसित केले आहे. दरवर्षी शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागातही वीज कोसळून जिवीतहानी होते. कोणत्याही आर्थीक भरपाईने ते नुकसान भरुन येऊ शकत नाही. त्यासाठी जिवीतहानी टाळणेच हिताचे असते. जीवितहानी टाळणे हाच अ‍ॅपचा उद्देश आहे.

सेन्सरमधून (Sensor) विजांचा कडकडाट होण्यापूर्वी अर्धा तास आधी इशारा मिळतो. नेटवर्कतर्फे (Network) ‘आयआयटीएम’ (IITM) येथील ‘सेंट्रल प्रोसेसिंग युनिट’शी (Central Processing Unit) सेन्सर जोडण्यात आले आहेत. त्यामुळे वादळी पाऊस, विजांच्या कडकडाटाचे अचूक अंदाज आणि घडामोडी नागरिकांना घरबसल्या समजणार आहेत. वादळी वार्‍यांसह येणारा पाऊस आणि वीज पडल्यामुळे होणारे नुकसान या अपडेटमुळे टाळणे शक्य होणार आहे.

अ‍ॅपवर ठिकाण टाकल्यानंतर त्या भागातील वादळी वारे अथवा विजेच्या कडकडाटांची शक्यता असल्यास ती समजणार आहे.गेल्या वर्षी करोनामुळे याचा फारसा प्रचार प्रसार होऊ शकला नाही. यंदा मात्र गावा गावात प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये हे अ‍ॅप दिसावे, असा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

जिवीत हानी होऊच नये

सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी, आशा वर्कर्स, तलाठी मंडल अधिकारी,सरपंच, पोलिस पाटील, अंगणवाडी सेवीका, कृषीसेवक, कोतवाल, आरोग्य सेवक, ग्रामपंचायतीचे डाटा एन्ट्री ऑॅपरेटर यांना तातडीनेे हे अ‍ॅप डाऊन लोड करुन घेेण्यास सांगितले जाणार आहे. प्रत्येक गावातील शासकीय अधिकारी कर्मचारी यांंना या अ‍ॅपद्वारे गावातील लोकांना त्याबाबत ज्ञात करुन जीवीताचे रक्षण केले जाणार आहे. नाशिक जिल्ह्यात याची तयारी सुरु झाली असून त्यामुळे जिवीत हानी होऊच नयेे, असाच आपत्ती व्यवस्थापन विभागाचा प्रयत्न आहे. असे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे व्यवस्थापक श्रीकृष्ण देशपांडे यांनी सािंंगतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com