आगामी निवडणूका स्वबळावरच लढविणार - नाना पटोले

आगामी निवडणूका स्वबळावरच लढविणार - नाना पटोले

नाशिक । प्रतिनिधी Nashik

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ( Local Body Elections )म्हणजे कार्यकर्त्यांच्या निवडणूका आहेत.त्यामुळे आघाडी करून लढण्यापेक्षा पेक्षा स्वबळावर लढलो तर काँग्रेस पक्षाच्या जागा मोठ्या प्रमाणात निवडून येतील.याची शहरातील पक्षसंघटना वाढीस निश्चितपणे मदत होईल.त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्तेच लढविणार असून त्यांना संधी दिली जाणार आहे. यात ' एकला चलो रे ' ची भावना कार्यकर्त्यांची असल्याने आगामी निवडणूका स्वबळावरच लढविण्याचा निर्णय घेतल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole)यांनी सांगितले.

काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मंथन शिबीर रविवारी (दि.१८) नाशिकमध्ये झाले.त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, कार्यकर्ते पक्षवाढीसाठी झटत असतात तेच विधानसभा, लोकसभेसारख्या निवडणूकांमध्ये पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत असतात.

महानगरपालिका, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्त्यांना उमेदवारी करण्याची संधी असते.त्यामुळे आगामी निवडणूका कार्यकर्त्यांच्या असून त्यांना संधी मिळावी,याकरीता त्या स्वबळावर लढविण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याचे पटोले यांनी सांगितले.या निवडणूका महाविकास आघाडीने एकत्रितरित्या लढवाव्यात अशी इच्छा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केली असल्याचे विचारले असता पटोले यांनी या निवडणूका स्वबळावर लढविल्या जाव्यात,अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे सांगत, प्रश्नाला बगल दिली.

या निवडणूका कार्यकर्त्यांसाठी असल्याने त्या स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला असून याबाबत पुण्यातही चर्चा झाल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील गुंतवणूक गुजरातला पळविल्याने येथील दोन लाख जणांची रोजगाराची संधी गेली आहे. परंतू,त्याचबरोबर राज्याला दरवर्षी मिळणार असलेला २७ हजार कोटींचा महसूल बुडाल्याची खंतही पटोले यांनी व्यक्त केली.

पदासाठी हपापलेला नाही

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत हालचालीवर बोलताना प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले,सद्या पक्षाची अतंर्गत निवडणुक प्रक्रीया सुरू आले. काँग्रेस असा एकमेव पक्ष आहे,ज्यात निवडणुकीने अध्यक्ष निवडला जातो. काँग्रेस मध्ये ही निवडणुकीची प्रक्रिया होते त्यातून सगळ्यांना जावे लागत. पक्षांतर निवडणुका होतात. कधी बिनविरोध होतात तर कधी निवडणूक प्रक्रिया होते, त्यातून सगळ्यांना जावे लागते.

राजकारणात या विषयात फिल्डिंग हा विषय नसतो, मी तुम्हाला निवडणुकीची प्रक्रिया सांगितली. निवडणुकीची प्रक्रिया सुरू असते, तेंव्हा इथे फिल्डींग लोकांमध्ये लावावी लागते. काँग्रेस पक्षांतराची निवडणूक प्रक्रिया सुरू असून याबाबत सोमवारी बैठक आहे. त्यात सर्व बीसीसी डेलिकेट त्याच्यामध्ये निर्णय होणार आहे.

अध्यक्ष कोणता आमच्या सगळ्यांचा आग्रह आहे की राहुल गांधींनी अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे,यासाठी उद्या बैठक आहे. अशीच राज्याची प्रक्रिया होणार आहे, त्यात ज्याला कुणाला उभे राहायच्े तो उभा राहू शकतो, अशा प्रक्रिया चालूच राहणार आहे. हे बघा मी फार यामध्ये हापापलेला नाही. राष्ट्रीय नेतृत्वाने जी जबाबदारी दिली ती मी प्रामाणिकपणे पार पाडली असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com