Monday, May 6, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्हा बँक निवडणूक स्थगितीला पुन्हा मुदतवाढ?

जिल्हा बँक निवडणूक स्थगितीला पुन्हा मुदतवाढ?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्य शासनाने नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (Nashik District Central Co-operative Bank )आर्थिक परिस्थती ( Economical Condition ) व प्रशासक मंडळ नियुक्ती याचा विचार करून बँकेची निवडणूक स्थगित करण्याचे आदेश दि.27 ऑगस्ट 2021 रोजी दिले होते. त्यानुसार दि. 31 मार्च 2022 पर्यंत ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. ही मुदत आज गुरुवारी (दि. 31) संपुष्टात येत आहे. त्यामुळे निवडणुकीवरील ( Election )स्थगिती उठणार की, पुन्हा स्थगितीला मुदतवाढ मिळणार याबाबत सहकार प्राधिकरणाकडून काय आदेश येतात, याकडे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष वेधले गेले आहे.

- Advertisement -

जिल्हा बँकेवर सध्या प्रशासक असून, बँकेची आर्थिक स्थिती फारशी सुधारलेली नाही. त्यामुळे जिल्हा बँक निवडणूक स्थगितीस पुन्हा मुदतवाढ मिळू शकते, असे बोलले जात आहे.

राज्य शासनाने सहकार विभागाला आदेश देत, जिल्हा बँकांच्या रखडलेल्या निवडणुका घेण्याचे आदेश काढले. त्यानुसार सागंली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई,पुणे, उस्मानाबाद व लातूर जिल्हा बँकांच्या निवडणुका घेण्याची तयारी सहकार प्राधिकरणाने केली होती. त्यानुसार जिल्हा बँक निवडणुकीचा बिगुल देखील वाजला होता.

यात ठराव मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र,विभागीय सहनिबंधक कार्यालयाने सहकार आयुक्तांना, बँकेची आर्थिक स्थिती आणि सध्या राज्य सरकारने नेमलेले प्रशासकीय मंडळ या सर्व बाबींचा विचार करावा, यासंदर्भातील सहकार निवडणूक प्राधिकरणाला सादर झालेल्या आहवालाच्या आधारे सहकार विभागाने नाशिक व अन्य तीन बँकांचा निवडणूक कार्यक्रम स्थगित केला होता.

नाशिकसह नागपूर, सोलापूर व बुलडाणा या जिल्हा बँकांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर आदेशापासून दि. 31 मार्च 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात याव्यात, असे आदेशात म्हटले होते. आता ही मुदत संपत आहे. मात्र, सहकार विभागाकडून अद्याप कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीबाबत कोणता निर्णय घेतला जातो याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या