Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यापुरुषप्रधान मंत्रिमंडळात नाशिकच्या महिलेला स्थान मिळणार का?

पुरुषप्रधान मंत्रिमंडळात नाशिकच्या महिलेला स्थान मिळणार का?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आज तब्बल ४० दिवसानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झाला आहे. १८ मंत्र्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. एकही महिला या मंत्रीमंडळात नसल्यामुळे विरोधकांनी शिंदे-फडणवीस गटाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील मंत्रिमंडळ विस्तारात नाशिककरांच्या आशा पल्लवित झाल्या असून महिलेच्या रूपाने नाशिकच्या (Nashik) पारड्यात मंत्रीपद पडणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे…

- Advertisement -

नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) या उच्चशिक्षित असून त्यांचा समावेश मंत्रिमंडळात केला जाऊ शकतो अशी मोठी चर्चा सुरुवातीला होती. मात्र, मंत्रीमंडळाच्या पहिल्या विस्तारत त्यांना स्थान मिळालेले नाही.

तसेच नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे (Sima Hire) यांनादेखील महिला म्हणून आणि निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तविली जात होती मात्र, अद्याप त्यांनाही मंत्रिमंडळाची लॉटरी लागलेली नाही.

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; १८ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

महिलेला मंत्रिपद मिळाले नाही म्हणून होणारी सततची टीका टाळण्यासाठी पुढील मंत्रीमंडळात शिंदे गट (Shinde Group) आणि भाजप (BJP) यांच्याकडून महिलांना संधी देण्यात येण्याची शक्यता आहे.

त्यामुळे येणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात महिलांना स्थान दिले जाण्याची शक्यता असून नाशिककरांच्या मंत्रीपदाच्या आशा मात्र यानिमित्ताने पल्लवीत झाल्या असून दोन्हीही आमदारांच्या कार्यकर्त्यांकडून पुढच्या मंत्रीमंडळ विस्तारत मंत्रीपद आपल्यालाच अशा चर्चाही यानिमित्ताने व्हायला सुरुवात झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या