
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पंचवटी परिसरात वन्यजिवांच्या (wildlife) अवयवांची विक्री करणाऱ्या संशयितास वनविभागाच्या (Forest Department) पथकाने सापळा रचत अटक केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वनविभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक व्यक्ती हा पंचवटी परिसरात इंद्रजाल समुद्र प्राणी, वन्यजीवांची शिंगे, वन्यप्राण्याचे नखे अवैधरित्या (Illegally) विक्री करत होता, या माहितीच्या आधारे वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सापाला रचला आणि संबंधित संशयिताला ताब्यात घेतले.
या सापळ्यात संशयित धनेश टेकम याला ताब्यात घेतले असून. त्याच्याकडे असणाऱ्या वन्यजीवांची अवयव जप्त करण्यात आली. यानुसार त्याच्यावर वन्यजीव अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आला असून पुढील तपास वन विभागाकडून करण्यात येत आहे.