अमेरिकन राष्ट्रध्यक्षाचा शपथविधी 20 जानेवारीलाच का होतो?

जो बायडन
जो बायडन

न्यूयार्क

जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ताक असलेल्या अमेरिकेच्या नवीन राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळा 20 जानेवारी रोजी होणार आहे. भारतात पंतप्रधानांचा शपथविधीसाठी निश्चित तारीख नसते. तो सोईनुसार मुहूर्त पाहून होत असतो. परंतु अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी 20 जानेवारीला होत असतो.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट यांचा शपथविधी 20 जानेवारी 1937 रोजी झाला होता. त्यानंतर सर्व राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी 20 जानेवारीला होत आहे. 20 जानेवारी रोजी रविवार आला तरी शासकीय शपथविधी पार पडतो. त्यानंतर 21 जानेवारी रोजी जनतेसाठी कार्यक्रम होतो. आता जो बायडन यांचा शपथविधी समारंभ 20 जानेवारी 2021 रोजी अमेरिकन वेळेनुसार 11.30 (भारतीय वेळ रात्री 10.00) वाजता होणार आहे. त्यानंतर जो बायडन आणि कमला हॅरिस अधिकृतरीत्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उप-राष्ट्राध्यक्ष होतील. पण कोव्हिड 19ची साथ आणि कॅपिटल इमारतीवर नुकताच झालेला हल्ला यामुळे यावेळी हा सोहळा भव्यदिव्य असणार नाही. अमेरिकेच्या नवीन राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्याला 'इनॉगरेशन' म्हटले जाते.

जो बायडन
जो बायडन

काय असते शपथ

"मी पूर्ण गांभीर्याने शपथ घेतो की मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी निष्ठेने पार पाडीन आणि अमेरिकेच्या संविधानाचे जतन, संरक्षण आणि समर्थन करण्यासाठी माझ्यापरीने सर्वोत्तम प्रयत्न करीन.’

डोनाल्ड ट्रंप हजर राहणार का?

मावळत्या राष्ट्राध्यक्षांनी नवीन राष्ट्राध्यक्षांना शपथ घेताना पाहण्यासाठी हजर राहणे हा शिष्टाचार आतापर्यंत कायम पाळला गेला आहे. पण यावर्षी असे होणार नाही. या सोहळ्याला मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हजर राहणार नाहीत. ट्रंप यांच्या शपथविधीला हिलरी क्लिंटन त्यांचे पती माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यासोबत हजर होत्या. आतापर्यंत जॉन अॅडम्स, जॉन क्विन्सी अॅडम्स आणि अँड्र्यू जॉन्सन या तीनच राष्ट्राध्यक्षांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याच्या शपथविधीला हजर न राहणं पसंत केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com