Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्र१० हजाराच्या उच्चांकानंतर सोयाबीनमध्ये का झाली घसरण ?

१० हजाराच्या उच्चांकानंतर सोयाबीनमध्ये का झाली घसरण ?

बाजारातही सोयाबीनचे दर दिवसेंदिवस कमी होत आहे. आठवड्याभरात सोयाबीनच्या दरात तब्बल ४० टक्के घसरण झाली आहे. शेतकरी बाजारात सोयाबीन घेऊन येत आहेत. आवक सुरु असतानाच भावामध्ये घसरण सुरु झाली आहे.

देशात सर्वाधिक सोयाबीनचं उत्पादन घेणारं राज्य अशी महाराष्ट्राची ओळख आहे. मागील हंगामात शेवटच्या काळामध्ये सोयाबीनच्या दरात चांगलीच वाढ पहावयास मिळाली होती. दर दहा हजाराच्या पुढे गेले होते. दराचा विचार केला तर प्रतिक्विंटलमागे किमान पाच हजार रुपयांचा थेट फटका शेतकर्‍याला सहन करावा लागत आहे.

- Advertisement -

४९९ रुपयांत करा Ola ची इलेक्ट्रिक स्कूटर बुक

खरे तर चार ते पाच दिवसांपूर्वीपर्यंत दहा मॉईश्चरसाठी 10 हजार प्रतिक्विंटल असा सोयाबीनचा दर होता. मात्र बाजारात आवक वाढू लागली तसा दर आठ हजार दोनशेवर आला. त्यानंतर तर थेट 5500 ते 5700 या घरात दर कोसळला. जवळपास चाळीस टक्के दरात घसरण झाली. यासाठी इतके मोठे काय कारण घडले की दर पडावा, असा सवाल शेतकरी करू लागला आहे.

केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात 15 लाख मेट्रिक टन सोयाबीन केक (पेंड) आयात केली आहे. आणखी आयातीचे करार होत आहेत. तर खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी केले आहे. यामुळे सोयापेंड 12 लाख टन आयात झाली आहे. यातूनच दर पडले असल्याचे जाणकारांतून सांगण्यात येते.

महिन्यापुर्वी १२ लाख टन सोयाबीन आयातीचा निर्णय

शेतकरी संघटनेचे नेते अनिल घनावत म्हणाले की, महिन्याभरापुर्वी १२ लाख टन सोयाबीन आयातीचा निर्णय झाला होता. त्यामुळे ही घसरण दिसत आहे. आयात करण्यात आलेला सोयाबीन पोल्टी उद्योगासाठी खाद्य म्हणून वापरण्यात येणार आहे. परंतु गेल्या चार दिवसांपासून कमी होत असलेली किंमत आश्चर्यकारक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या