Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedकाय आहे राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्व

काय आहे राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्व

भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. देशातील वैज्ञानिक विचारांच्या नागरिकांना संधी देणे तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकप्रिय करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो.

सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर १९८७ साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव होते. दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याचे त्यांनी केंद्र सरकारला सुचवले.

- Advertisement -

२८ फेब्रुवारी निवडण्याचे कारण म्हणजे १९२८ मध्ये याच दिवशी सी.व्ही. रामन यांनी ‘रमण परिणामा’चा शोध लावला. ज्याला १९३० साली नोबेल पुरस्कार मिळाला. देशातील वैज्ञानिक विचारांच्या नागरिकांना संधी देणे तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकप्रिय करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो.

रामन यांचे संशोधन ‘नेचर’ या ब्रिटिश नियतकालिकास फेब्रुवारी १९२८ मध्ये पत्राद्वारे कळविला. रामन यांचे हेच संशोधन ‘रामन-परिणाम’ या नावाने जगद्विख्यात आहे. या शोधाकरिताच त्यांना नोबेल पारितोषिकाचा सन्मान प्राप्त झाला. रेणवीय संरचना व प्रारण यासंबंधी पुढे झालेल्या संशोधनावर रामन परिणामाचा इतका मोठा प्रभाव पडला की, रामन यांना आधुनिक भौतिकीच्या इतिहासातील एक आद्य विचारवंत म्हणून मान्यता मिळाली.

२१ वे शतक हे विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचे मानले जाते आणि ते खरे ठरत आहे. कारण आज आपण आपल्या आजूबाजूला पाहिले तर या विज्ञानामुळे आपली प्रगती खूप वेगाने होत चाललेली आपणाला दिसते आहे. नवनवीन यंत्रे, तंत्रज्ञान हे बदल सर्व विज्ञानामुळे होत आहेत. आपल्या समाजामधील ज्या अंधश्रद्धा होत्या त्या विज्ञानामुळेच नष्ट झाल्या आहेत आणि हे एक चांगल्या प्रगतीचे लक्षण मानले जाते. आपल्याला ज्या सुखसोई आता उपलब्ध आहेत, त्या फक्त आणि फक्त विज्ञानामुळे आहेत आणि आपण भविष्यात काय घडवू शकतो हे सुद्धा विज्ञानच ठरवू शकते.

- Advertisment -

ताज्या बातम्या