बिबटे का येऊ लागले शहरात, जाणून घ्या...

बिबटे का येऊ लागले शहरात, जाणून घ्या...

देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp

येथील लष्करी परिसरातील जंगल (Forest) व दारणा (Darna) काठचा भाग यामुळे बिबट्याच्या (Leopards) वास्तव्यासाठी पोषक वातावरण असल्याने गेल्या काही वर्षांत बिबट्याचे नागरी वस्तीवर झालेले हल्ले चिंताजनक आहे....

बिबटे का येऊ लागले शहरात, जाणून घ्या...
बॉलीवूड अभिनेत्यांच्या बॉडीगार्डचे पगार ऐकून थक्क व्हाल ?

यासाठी वनविभागाने (Forest Department) कृतिशील कार्यक्रमाद्वारे वन्य प्राण्यांपासून नागरिकांचे संरक्षण करणे गरजेचे झाले आहे.

भारतीय लष्करी विभागाच्या देवळाली कॅम्प (Deolali Camp) येथील साऊथ एअरफोर्स भागातील (South Airforce Area) पंधरा किलोमीटरच्या परिसरात जंगल वाचविण्यासाठी पूर्वी राज्य शासनाच्या (State Government) वन विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी बिबटे सोडले होते.

केवळ जंगल बचाव या उद्देशाने हा उपक्रम राबविला गेला असला तरी जंगलातील खाद्य व पाणी कमी पडू लागल्याने बिबट्यांची धाव आता नागरी वस्तीकडे पडू लागली आहे.

गेल्या पाच वर्षात दारणा काठच्या पट्ट्यामध्ये भगूर, लहवीत, वंजारवाडी, लोहशिंगवे, राहुरी, दोनवडे, नानेगाव, संसरी, शेवगेदारणा, पळसे, मोहगाव, बाभळेश्वर, हिंगणवेडे, जाखोरी यांसह देवळाली कॅम्प, भगूर या शहरी भागातील कॉलनीमध्ये थेट घरात घुसण्याचा प्रयत्न बिबटे करीत आहे.

अनेक पाळीव प्राणी (Pets) त्यांनी भक्ष केले आहेत, गतवर्षी दोनवडे (Donawade) येथे शिरोळे कुटुंबातील एका लहानग्याचा बळी बिबट्याने घेतला होता तर 8 वर्षांपूर्वी भगूर (Bhagur) येथे शेतात खेळत असताना बिबट्याने 5 वर्षीय बालिकेला उचलून नेले होते.

वंजारवाडी (Wanjarwadi) येथेही असच प्रयत्न झाला. विंचुरी दळवी (Vinchuri Dalvi) येथे घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीवर व लॅमरोड (Lam Road) भागात बादल उन्हवणे (Badal Unhawane) यांच्यावर झालेला हल्ला चिंताजनक आहे.

तसेच देवी मंदीर परिसरात चंद्रकांत कासार (Chandrakant Kasar) यांचे एका महिन्यात 2 पाळीव कुत्रे बंगल्याच्या वारांड्यातून उचलून नेले. रेस्ट कॅम्प रोडवरील (Rest Camp Road) सोसाईटी परिसरात भगूरचे नगरसेवक दीपक बलकवडे (Deepak Balkwade) यांच्या बंगल्याच्या परिसरात बिबट्याने मारलेली उडी सर्वांना धक्का देऊन गेली.

वनविभाग (Forest Department) सातत्याने बिबटे पकडण्यासाठी ठिकाणी पिंजरे (Cage) लावत आहेत. वर्षभरात सुमारे बारा बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. मात्र बिबट्यांची संख्या कमी होत नाही, ही चिंतेची बाब आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com