एटीएम व बॅंकांच्या सुरक्षेची जबाबदारी फक्त पोलिसांची का?

एटीएम व बॅंकांच्या सुरक्षेची जबाबदारी फक्त पोलिसांची का?

नाशिक | निशिकांत पाटील 

नाशिक शहरात (Nashik City) असलेल्या बऱ्याचशा एटीएम व बॅंकांच्या (ATMs and Bank) ठिकाणी सुरक्षा रक्षकच नसल्याने त्यांच्याकडे असलेल्या ठेवीदारांच्या किंवा खातेदारांच्या कोट्यावधी रुपयांची जबाबदारी फक्त पोलिसांनी (Police) का घ्यायची असा सवाल अंबड औद्योगिक वसाहतीतील (Ambad Industrial Estate) पाथर्डी फाटा गरवारे सर्व्हिस रोड वरील (दि.२० जुलै रोजी) घडलेल्या इंडियन बॅंकेच्या घटनेतून समोर येत आहे... 

नाशिक शहरात जवळपास प्रत्येक चौकात एक किंवा दोन मिनिटांवर विविध बॅंकांचे एटीएम मशिन आहेत मात्र यातील बऱ्याचशा ठिकाणी सुरक्षा रक्षकच बॅंकांनी नेमलेले नाहीत तर काही ठिकाणी पूर्वी असलेल्या सुरक्षा रक्षकांना "कॉस्ट सेविंग" नावाने कामावरून कमी केले आहे. गेल्या आठवड्यात (दि.२० जुलै) अज्ञात चोरटयांनी पाथर्डी फाटा  गरवारे सर्व्हिसरोड वरील इंडियन बॅंकेचा लॉकर रूमच्या वरील स्लॅब ब्रेकरच्या सहाय्याने तोडून दरोड्याचा प्रयत्न केला होता मात्र सुदैवाने चोरट्यांना लॉकर तोडण्यात यश मिळाले नाही.

जर चोरट्यांचा (Thieves) हा प्रयत्न यशस्वी ठरला असता तर लॉकर धारकांचे लाखोंचे किंवा कोट्यवधींचे नुकसान झाले असते. सदरहू बॅंकेत यापूर्वी सुरक्षारक्षक होता मात्र त्याला बऱ्याच दिवसांपूर्वी कामावरून कमी करण्यात आले होते. नाशिक शहरात अशाच प्रकारे काही बॅंकांनी देखील त्यांचे सुरक्षा रक्षक कमी केले असल्याचे दिसून येते. तर बऱ्याच एटीएम च्या बाहेर देखील सुरक्षा रक्षक नसल्याचे निदर्शनास येते.

इंडियन बॅंकेत (Indian Bank) चोरी करण्याचा प्रयत्न जरी फसला असला तरी पोलीस खात्याला मात्र अजून एक काम वाढले आहे. अद्यापही त्या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस बळ कार्यरत आहे.  शहरातील सर्वच स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये (Police Station) कामाचा तणाव प्रचंड असतो. हद्दीतील कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्याचे काम पोलिसांना करावे लागत असतांनाच इंडियन बॅंकेसारखा एखादा प्रकार समोर आला कि हातचे काम सोडून त्यांच्या मागे लागावे लागत असल्याने त्याचा तणाव इतर पोलिसांवर येतो. 

पोलीस प्रशासनातर्फे शहरातील ज्या एटीएम व बॅंकांमध्ये सुरक्षा रक्षक व सीसीटीव्हीची व्यवस्था नाही अशांची यादी बनवून त्यावर तात्काळ कारवाईचा बडगा उचलण्याची गरज आहे. घरात आपले सोने किंवा इतर दागिने किंवा काही पैसे व महत्वाची कागदपत्रे सुरक्षित नाही अशी भावना झाल्यानंतर नागरिक एखाद्या बॅंकेत जाऊन लॉकर उघडून आपले सर्व मौल्यवान वस्तू त्याठिकाणी ठेवतात अशा वेळी त्यांनी सदरहू बॅंकेत सुरक्षेची काय व्यवस्था करण्यात आली आहे याची माहिती घेणे व त्यानंतरच आपले खाते त्या बॅंकेत (Bank) उघडणे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com