एक्झीट पोल का ठरतात फेल ?

एक्झीट पोल का ठरतात फेल ?

बिहार विधासभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी पार पडली. रात्री ‌‌‌उशीरा निकाल जाहीर झाले. सकाळी मतमोजणी सुरु होताच एक्झीट पोल खरे वाटू लागले. परंतु हळूहळू एक्झीट पोल फेल झाल्याचे दिसू लागले. भारतात एक्झीट पोल फेल होण्याचे प्रमाण 30 टक्के तरी आहे. एक्झीट पोल नेमके काय आहे? तयार कसे केले जाते? विज्ञान आहे की काय?

यातील जवळपास सर्वच एक्झीट पोलनुसार महाविकास आघाडीची सत्ता आलेली दाखवली आहे. परंतु निकालानंतर एनडीए सत्तेत आले. फक्त बिहारच नाही तर गुजरात, हिमाचल, हरियाणा, यूपी, पंजाब व दिल्ली निवडणुकीतही एक्झीट पोल फेल झाले आहेत.

सेफॉलोजी विज्ञान नाही. परंतु निवडणुकीचे वैज्ञानिक विश्लेषण त्यात केले जाते. मतदानाचा पॅटर्न, मतदानाची टक्केवारी त्याचा प्रभाव सेफॉलोजीस्ट करतात. इतिहासात डोकविल्यास त्याची सुरवात अमेरिकेत 1935 मध्ये झाली. जार्ज गॅलप याने या शास्त्राचा शोध लावला. त्यानंतर या शास्त्राचा प्रचंड विकास झाला. अमेरिकेत जनमत पाहणी करणार्‍या अनेक संघटना उदयास आल्या. भारतातही सेफोलॉजीचा वापर आता मोठ्या प्रमाणावर केला जातो. भारतात हे शास्त्र विकसित करण्याचे श्रेय डॉ.प्रणय रॉय आणि योगेंद्र यादव यांना दिले जाते. 1989 मध्ये प्रणय रॉय यांनी इंडिया टुडेसाठी पहिले व्यावसायिक सर्व्हेक्षण केले. त्यावेळी निवडणुकीपूर्वी, निवडणुकी दरम्यान आणि मतदानानंतर संख्या एकत्र करुन निष्कर्ष जाहीर करण्यात आले होते.

ओपिनियन पोल व एक्झिट पोलमधील फरक

ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल कोणत्याही सार्वत्रिक निवडणुकांमधील महत्त्वाचे घटक झाले आहेत. मतदानापूर्वी साधारण कोणत्या पक्षाकडे कल आहे, हे लक्षात घेण्यासाठी ओपिनियन पोल केला जातो. म्हणजे मतदानापुर्वी केलेली चाचणी म्हणजे ओपिनियन पोल आहे. तर मतदानानंतर कोणाला किती मते मिळाली, याचा अंदाज एक्झिट पोलच्या माध्यमातून काढले जाते. हे दोन्ही पोल तंतोतंत बरोबरच असते, असे क्वचितच घडते.

एक्झिट पोल कसा करतात

जेव्हा मतदार मतदान करुन बाहेर येतो तेव्हा त्याला प्रश्न केला जातो की मतदान कोणाला केले आहे. परंतु हा सँम्पल सर्व्हे असतो. लाखो लोकांमागे हजार व्यक्तीचा केला जातो. त्यातून प्रत्येक मतदार खरे उत्तर देईल, असे नसते. विधानसभा किंवा लोकसभा मतदार संघातील वेगवेगळे मतदान केंद्र निवडले जातात.

मतदान सकाळी 7 ते 5 असला तरी सर्व्हे या पुर्ण वेळेत होत नाही. काही वेळेत तो होतो. आपल्याकडे वेळेनुसार मतदानाचा पॅटन बदलत असतो. तो फरकही एक्झिट पोलमध्ये पडतो. आधी सँपलिंगची पद्धत विश्वासार्ह होती. आता मिळणारा प्रतिसादही कमी झाला आहे आणि मिळणाऱ्या माहितीचा दर्जा खालावला आहे. भारतातील मतदार विकसित देशासारखा शिक्षित नाही. तसेच धर्म व जातीवर आधारित मतदान भारतात होत असते.

2014 मध्ये काय झाले ?

2014 चे एक्झिट पोलमने वर्तवलेले अंदाज बहुतांशी खरे ठरे पण याआधी 2004 मध्ये आणि 2009 च्या निवडणुकांचे अंदाज मतदारांचा कौल जाणून घेण्यात अपयशी ठरले. एक्झिट पोलचे अंदाज पूर्णपणे चुकले ते 2004 मध्ये.

2004 व 2009 मध्ये काय झाले?

2004 साली बहुतांश एक्झिट पोलमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचं एनडीए सरकार येईल, अशी भविष्यवाणी झाली होती. पण त्यावेळी NDA ला 189 जागा मिळाल्या तर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली UPA ला 222 जागा मिळाल्या. यावेळी मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. यानंतर 2009 मध्येही एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे ठरले. यामध्ये यूपीएचा विजय होईल असे अंदाज होते पण काँग्रेसला 200 जागा मिळतील, असं कुणी म्हटलं नव्हतं. प्रत्यक्षात मात्र काँग्रेसला 206 जागा मिळाल्या तर यूपीएला 262 जागा मिळाल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com