Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याखडसे यांनी का मागितली ब्राम्हण समाजाची माफी वाचा...

खडसे यांनी का मागितली ब्राम्हण समाजाची माफी वाचा…

मुंबई

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतांना भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले एकनाथ खडसे यांनी ब्राम्हण समाजाबद्दल वक्तव्य केले होते. त्यावर आज खडसेंनी त्यांच्या टिट्व वरून ब्राह्मणांसंदर्भात केलेल्या वक्त्यावरुन माफी मागीतली.

- Advertisement -

फडणवीस यांच्यावर टीका करतांना मी मुख्यमंत्रीपद एका ब्राह्मणाला दान दिले असे वक्तव्य खडसे यांनी केले होते. त्यामुळे खडसे यांच्यावर टीक होत होती. ब्राह्मण महासंघानेही त्यावर तीव्र आक्षेप घेतला होता. त्यानंतर वाद चिघळू नये म्हणून खडसे यांनी माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचंही ते म्हणाले.

खडसे म्हणाले, दि. ६ नोव्हेंबर २०२० रोजी मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.

काय म्हणाले होते खडसे?

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्रिपदावरून भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होते. पण ‘हा नाथाभाऊ दिलदार आहे. त्यावेळी नाथाभाऊ तुम्ही घरी बसा, मला मुख्यमंत्री व्हायचे आहे, असे सांगण्यात आले होते. मी भल्याभल्यांना दान देतो. मग एका ब्राह्मणाला दान देण्यात हरकत काय आहे’, असे वक्तव्य खडसे यांनी केले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या