Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यामाती परीक्षण का करायचे?

माती परीक्षण का करायचे?

नाशिक | विजय गिते | Nashik

शेत जमिनीमध्ये (Farm lands) वारंवार एकच पीक (one crop) घेतले जात असल्यामुळे जमिनीतील काही अन्नद्रव्यांचा र्‍हास (Depletion of nutrients) होतो आहे. पूर्वी आपल्याकडे मिश्र पीक पद्धती (Mixed cropping methods) होती.

- Advertisement -

यामुळे जमिनीतील सजीवता व सुपीकता (Fertility) टिकून होती. मात्र अलीकडच्या काळात ही पद्धत बंद झाली आहे. शिवाय माती परीक्षणही (Soil testing) केले जात नाही. माती परीक्षण करून पीक पद्धतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. याबरोबरच सेंद्रिय पद्धतीने शेती उत्पादन (Agricultural production) घेतल्यास जागतिक बाजारपेठेतही आपण टिकून राहू,हीच काळाची गरज आहे.

शेतकरी (farmers) सतत एकच पीक घेत असल्यामुळे जमिनीतील काही अन्नद्रव्यांचा र्‍हास होतो. यामुळे आपण रासायनिक खतांचा अतिरेक वापर (Excessive use of chemical fertilizers) करतो. पूर्वी जमिनीचा सामू कमी होता. आता आपण अंदाजे खतव्यवस्थापन करत असल्यामुळे जमिनीचा समतोल बिघडत आहे. यासाठी माती परीक्षण करणे गरजेचे आहे. यातून जमिनीचा सामू, अन्नद्रव्य प्रमाण, पाणी धरण्याची क्षमता यासारख्या अनेक गोष्टी आपणास कळतात. त्यातून योग्य पीक निवडण्यास मदत होते.

– संदीप जगताप,प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

शेती म्हटलं की माती हा विषय प्रामुख्याने येतो. शेतीमध्ये जिवंतपणा असला की, जे पीक आपण घेतो ते डौेलदार येते. भरघोस पिकासाठी माती परीक्षण (Soil testing) करणे गरजेचे आहे. येणार्‍या काळात सेंद्रिय शेतमालाची (Organic farming) मागणी वाढणार आहे. हा शेतमाल पिकविण्यासाठी शेतकर्‍यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. याकरिता माती परीक्षण करून शेती समृद्ध कशी होईल व शाश्वत आर्थिक उत्पन्न कसे येईल. हे शेतकर्‍यांनी पाहावे. मातीचा जिवंतपणा कसा राहील हे पाहणे गरजेचे आहे. जागतिक बाजारपेठेत आपला शेतमाल कसा टिकाव धरेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अलीकडच्या काळात मातीमध्ये जिवंतपणा राहिला नसल्याने उत्पादनात घट होत चालली आहे. खर्चही भरमसाठ वाढत चालला आहे. सेंद्रिय पद्धतीने (Organic farming) शेती उत्पादन घेऊन जागतिक बाजारपेठेत टीकण्याचा प्रयत्न शेतकर्‍यांनी करणे ही काळाची गरज आहे.

– भारत दिघोळे, अध्यक्ष,राज्य कांदा उत्पादक संघटना

शेतकरी वर्षभर आपल्या शेतजमिनीमध्ये विविध प्रकारची पिके घेत असतो. यासाठी विविध निविष्ठांचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्याकडे त्याचा कल असतो. ज्या जमिनीतून आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात पीक उत्पादन घेतो, त्या जमिनीची तपासणी मात्र बराच वेळा केली जात नाही. पिकांना पोषक अन्नद्रव्ये पाहिजे असतात ते आपल्याला माती तपासणी करूनच लक्षात येतात. पिकाची जडण-घडण, मातीतील क्षार यांचे प्रमाण, भौतिक गुणधर्म, जमिनीत खेळती हवा राहण्याचे प्रमाण, जमिनीची घनता तसेच उपयुक्त सूक्ष्मजीव (Microorganisms) हे जमिनीत योग्य प्रमाणात आहे का? त्याचे प्रमाण किती आहे. हे माती परीक्षणातून तपासून घेता येते. माती परीक्षणाचा महत्त्वाचा फायदा असा होतो की, जमिनीत कोणत्या पोषक द्रव्यांची, अन्नाची कमतरता आहे. हे लक्षात येते. त्यातूनच मग आपल्याला पीकपद्धती मध्ये बदल करता येतो.

– डॉ.सुरेश दोडके, गहू संशोधन केंद्र कुंदेवाडी.

काळाची गरज ओळखून माती परीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हरितक्रांती जेव्हापासून आपल्याकडे आली तेव्हापासून जमिनीचा पोत रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे बिघडत चालला आहे. त्यामुळे आता माती परीक्षण करून पीक पद्धतीमध्ये बदल करणे काळाची गरज आहे. जमिनीवर आपण वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात जमीन निकृष्ट होईलच शिवाय शेती उत्पादनही निकृष्ट दर्जाचे होणार आहे. रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून म आण गोण्या जर कान्या म अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे जमिनीचा पोत दिवसेंदिवस खराब होत चालला आहे. याकरिता माती परीक्षण करून चांगले उत्पादन घेणे गरजेचे आहे.जमिनीचे व्यवस्थापन यासाठीच करणे आवश्यक आहे.अन्यथा अन्नसुरक्षाही धोक्यात येऊ शकते.शेतकरी रासायनिक खतावर भरमसाठ खर्च करत असल्यामुळे उत्पादनही विषमुक्त तयार होत आहे.त्यामुळे सेंद्रिय शेती काळाची गरज आहे.

– निवृत्ती न्याहारकर, कांदा उत्पादक

- Advertisment -

ताज्या बातम्या