Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यादेवेंद्र फडणवीस खडसेंच्या घरी का गेले ?

देवेंद्र फडणवीस खडसेंच्या घरी का गेले ?

मुक्ताईनगर

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आज मुक्ताईनगर दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील केळी बागांची पाहणी केली. तालुक्यातील उचंदा येथे आज केळींच्या बागांची पाहणी केली. या गावातात केळीचे एकही खोड जिवंत राहिलेले नाही. केळीचे हे १०० टक्के नुकसान झालेले आहे.

- Advertisement -

SSC Exam : परीक्षा घेण्याच्या मागणीवर न्यायालयाचा आता या तारखेला निर्णय

या दौऱ्यात देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी मुक्ताईनगरातील कोथळी येथील एकनाथ खडसे (eknath khadse ) यांच्या निवासस्थानी गेले. त्या ठिकाणी भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्यांशी १५- २० मिनिटे चर्चा केली. यावेळी भाजपा आमदार गिरीश महाजन ‌‌उपस्थित होते. मात्र एकनाथ खडसे मुंबईला गेल्यामुळे फडणवीस-खडसे या सध्याच्या राजकीय विरोधकांची भेट झाली नाही. एकनाथ खडसे यांच्या घरी जाण्याचे नियोजन फडणवीस यांनी जाणीवपुर्वकच केल्याची चर्चा आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या निवासस्थानी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आज सकाळी अकरा वाजून सात मिनिटांनी भेट दिली त्या प्रसंगी खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह खासदार उंमेश पाटील , आमदार संजय सावकारे , आमदार मंगेश चव्हाण , माजी आमदार स्मिता वाघ , माजी आमदार चैनसुख संचेती , डॉक्टर राजेंद्र फडके , अशोक कांडेलकर, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे , जि.प .सदस्य वनिता गवळी, मुक्ताईनगरच्या नगराध्यक्ष नजमा तडवी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांचे आशीर्वाद खासदार रक्षाताई खडसे यांचा मुलगा चिरंजीव गुरुनाथ तसेच कन्या कुमारी कृषिका यांनी घेतले.

विमा कंपन्यांनी नुकसानभरपाई द्यावी

यावेळी माध्यमांशी बोलतांना देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले, केळी उत्पादन शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी सरसकट नुकसानभरपाई द्यावी आणि शेतकऱ्यांपुढे कोणत्याही अडचणी निर्माण करू नयेत. राज्य सरकारने सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत केली पाहिजे. ज्यांचा विमा नाही, त्यांनाही मदत दिली पाहिजे. आपल्या सरकारच्या काळात विमा काढला असे समजून मदत देण्यात आली होती.

आपल्या सरकारच्या काळात हरिभाऊ जावळे यांची समिती गठीत करून विम्याचे निकष ठरवून तशा निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यामुळे सातत्याने चांगला पैसा शेतकर्‍यांना मिळाला. नवीन निकषांनी निविदा काढल्याने आता केवळ विमा कंपन्यांना लाभ. जुने निकष तत्काळ लागू केले पाहिजे.

फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी आपली समस्या त्यांच्यांकडे मांडल्या. एकीकडे सरकार मदत करीत नाही आणि दुसरीकडे विमा कंपन्यांकडून शेतकर्‍यांचा छळ सुरू आहे. पंचनामे करण्यासाठी, साधे अर्ज भरण्यासाठी विमा कंपन्या पैसे मागत आहेत, अारोप शेतकऱ्यांनी केला.

शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

मुक्ताईनगर तालुक्यातील मेळसांगवे येथील योगेश अंबादास पाटील या शेतकऱ्याने विरोधी पक्ष नेते यांचा ताफा अडवत त्यांचे दोन हजार नष्ट झालेले केळी पिकाची पाहणी करावी असा अर्ज करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी वेळेअभावी केळी पीक न पाहिल्याने संताप येऊन अखेर शेतकऱ्याने प्रसारमाध्यमांसमोर विषारी द्रव्यची बाटली घेऊन केवळ फोटो शूट करण्यासाठी हे दौरे काढण्यात येत असून केंद्र सरकारने सुद्धा नाही तसेच राज्य सरकारने सुद्धा शेतकऱ्यांना आजपर्यंत कोणत्याही प्रकारची सवलत दिलेली नसल्याचा आरोप केला. वयामुळे शेतकऱ्याला आज विष प्राशन करून आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे सांगून त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्याला वेळीच ताब्यात घेतल्याने हा अनर्थ टळला.

- Advertisment -

ताज्या बातम्या