Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या...होय, यामुळे फडणवीस आमच्या घरी आले

…होय, यामुळे फडणवीस आमच्या घरी आले

मुंबई

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) मंगळवारी मुक्ताईनगर दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील केळी बागांची पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी राजकीय विरोधक एकनाथ खडसे यांच्या घरी गेले. यासंदर्भात एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांनी मौन सोडले.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस खडसेंच्या घरी का गेले ?

एका वृत्तवाहिनीशी बोलतांना रक्षा खडसे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच आमच्या घरी आले होते असे नाही. यापूर्वीही ते घरी आले आहेत. आमच्या कुटुंबीयांशी त्यांचे संबंध चांगले आहेत. राजकारण हे राजकारणाच्या जागी आहे. त्यामुळेच, नाथाभाऊंचेही त्यांच्याशी बोलणे झाले. मी भाजपची खासदार आहे. माझ्या पक्षाचे नेते मतदारसंघात आल्यानंतर त्यांना घरी बोलवणे, चहापाण्यासाठी विचारणे माझे कर्तव्य आहे. ते मी केले. यावेळी कार्यकर्त्यांच्याही भेटी झाल्या.

आम्ही सर्व आमदार, पदाधिकारी, नेत्यांसोबत शेतात जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांच्या शंका फडणवीसांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. मागील आठ दिवसांत पाऊस, वारा यामुळे केळीचं मोठं नुकसान झालं आहे. केळीच्या बागा झोपल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हातातील माल गेला आहे. पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न ते नक्कीच विधानसभा आणि मुख्यमंत्र्यांसमोर मांडतील,असे यावेळी त्यांनी सांगितले .

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

आपल्या मुक्ताईनगर दौऱ्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस म्हणाले, खासदार रक्षा खडसे या भाजपच्या असून त्यांनी चहापानाचे निमंत्रण दिले. त्यामुळे आपण तेथे गेलो होतो. यात इतर कुठलेही कारण नव्हते.

एकनाथ खडसे सोमवरीच मुंबईत

देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी खडसे यांच्या कोथळी येथील मुक्ताई सदन या निवासस्थानी खासदार रक्षा खडसे यांच्याकडे सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान माजी मंत्री एकनाथ खडसे कुठेही दिसले नाहीत. ते सोमवारीच मुंबईला पोहोचले होते. मात्र, या भेटीवेळी एकनाथ खडसेंसोबतही फडणवीस यांचे बोलणे झाल्याचे रक्षा खडसे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या