राज कुंद्राला अटक, त्यानंतर अजिंक्य रहाणे का झाला ट्रोल

राज कुंद्राला अटक, त्यानंतर अजिंक्य रहाणे का झाला ट्रोल

ेवी दिल्ली :

प्रसिद्ध उद्योजक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी चा पती राज कुंद्राला (Raj Kundra) मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पण राजच्या अटकेनंतर आता भारताचा उपकर्णघार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हा ट्रोल व्हायला लागला आहे.

राज कुंद्राला अटक, त्यानंतर अजिंक्य रहाणे का झाला ट्रोल
केंद्रानंतर राज्य मंत्रिमंडळात बदलाचे वारे, या दोन मंत्र्यांना धोका

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे (Shilpa Shetty) पती आणि बिझनेसमॅन राज कुंद्रा (Raj Kundra) याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. अश्लील व्हिडीओ बनवणे आणि साइट्सवर अपलोड करणे या गुन्ह्यासाठी त्याला अटक करण्यात आली आहे.

रहाणेने 19 ऑक्टोबर 2012 रोजी राज कुंद्राला टॅग करत एक ट्वीट केले होते. यात अजिंक्यने असं म्हटलं होतं की सर तुम्ही चांगलं काम करत आहात. त्यावर राज कुंद्राने देखील अजिंक्यचे आभार मानले होते आणि तू अवश्य येऊन लाइव्ह पाहावे असं म्हटलं होतं.कुंद्राच्या अटकेनंतर रहाणे सोशल मीडिया ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. अनेक मीम्स शेअर करत रहाणेला ट्रोल केलं जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com