Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्याकाँग्रेस अध्यक्ष कोण? आज फैसला

काँग्रेस अध्यक्ष कोण? आज फैसला

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, खासदार मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर असे दोन दिग्गज नेते आमनेसामने आहेत. या निवडणुकीत कोणाचा विजय होणार आणि कोण काँग्रेसच्या अध्यक्षपदावर विराजमान होणार याचा फैसला आज होणार आहे.

- Advertisement -

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सोमवारी 96 टक्के मतदान झाले. ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार शशी थरूर यापैकी कौल कुणाला मिळतो हे बुधवारी (दि.19) मतमोजणीतून स्पष्ट होईल.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रदेश काँग्रेस प्रदेश समित्यांच्या 9,900 प्रतिनिधींपैकी 9,500 प्रतिनिधींनी मतदान केले. अनेक छोट्या राज्यांत 100 टक्के तर मोठ्या राज्यांत जवळपास 90 टक्के मतदान झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या