Friday, April 26, 2024
Homeजळगावकोण होणार अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती ?

कोण होणार अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती ?

अमळनेर  Amalner

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Amalner Agricultural Produce Market Committee) सभापतींची (Chairman) निवड (Election) उद्या १६ मे रोजी होत आहे. सभापती महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) होणार हे निश्चित असले तरी ही माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते याबाबत मोठी उत्सुकता (curiosity) लागली आहे. सभापतीपद आपल्याला मिळावे म्हणून इच्छूकांनी मुंबई दौरे केले असून देवही पाण्यात ठेवले आहेत. दरम्यान सभापती निवडीच्या वेळेस कोणताही धोका होऊ नये याकडे महाविकास आघाडीचे सर्व नेते लक्ष ठेवून आहेत.

- Advertisement -

VISUAL STORY : परिणीती चोप्राने केली नव्या आयुष्याची सुरूवात, भर कार्यक्रमातील ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

अमळनेर बाजार समितीचा पहीला सभापती होण्याचा मान कुणाला मिळतो ह्या कडे सर्वाचे लक्ष लागलेले आहे. 12 मे पासून 11सभासद मुंबई ला भेटी गाठीसाठी गेले होते. तिथ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदरावजी पवार ,खासदार सुप्रिया सूळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेतली होती.

VISUAL STORY # मानसी नाईक पुन्हा नववधू ?

आज रात्री धुळ्यात मुक्काम मंगळवारी सकाळी बाजार समितीत

दरम्यान महाविकास आघाडीचे सर्व सदस्य हे आज 15 मे रोज़ी रात्री धुळ्यात मुक्कामासाठी येणार आहेत. तर उद्या 16 मे रोजी निवडीच्या वेळेस ते अमळनेरला बाजार समितीत वेळेवर हजर होणार आहेत.

जळगावच्या म्हाळसेची ही आहे VISUAL STORY, स्टोरीत नथीचा नखरा करतोय सर्वाना घायाळ

हे आहेत इच्छूक

सभापती साठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिव बाळू पाटील , डॉ अशोक हिम्मत पाटील, अशोक आधार पाटील, ईचछुक असून काँग्रेस तफे डाँ अनिल शिंदे, सुभाष जिभाऊ, ईचछुक आहेत सर्वानी सभापती साठी गुडघ्याला बाशिंग बाधलेले आहे त्यामुळे सर्वाना एक एक वर्षे सभापती व उपसभापती ची ची समान संधी दिली जाईल अशी चर्चा  सुरू आहे .

VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरण

पहीला सभापती राष्ट्रवादी काँग्रेसचा ?

सभापतीची माळ कुणाच्या गळ्यात पडते ह्या कडे सर्वाचे लक्ष लागलेले असून पहीला सभापती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस चा व उपसभापती काँग्रेस चा राहील असा अंदाज  वर्तविला जात आहे  महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना साडे नऊ वाजता आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन ही आमदार कार्यालयातून करण्यात आलेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या