Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्या...कोण आहेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत?

…कोण आहेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत?

नवी दिल्ली | New Delhi

हवाई दलाच्या Mi-17V5 या अत्याधुनिक हेलिकॉप्टरला आज तामिळनाडूत अपघात झाला. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस हेड (chief of defence staff) बिपिन रावत हे त्यांच्या पत्नीसह प्रवास करत होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत….

- Advertisement -

बिपिन रावत (Bipin Rawat) हे देशातील पहिले CDS अधिकारी म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत.

सीडीएस हे लष्कर (Army), हवाई दल (Air Force) आणि नौदल (Navy) यांचे प्रमुख आहेत. त्यांच्यात समन्वय साधण्याची महत्वाची जबाबदारी त्यांची असते. संरक्षण मंत्र्यांच्या प्रमुख सल्लागारांपैकी ते एक असतात.

कोण आहेत बिपिन रावत?

बिपिन रावत यांचा जन्म १६ मार्च १९५८ रोजी डेहराडून येथे झाला. बिपिन रावत यांचे वडील एल. एस रावत देखील लष्करी सेवेत होते. लेफ्टनंट जनरल एल. एस. रावत म्हणून त्यांची ख्याती होती.

वडील लष्कारात असल्याने बिपिन रावत यांचे बालपण लष्करी वातावरणात केले. प्राथमिक शिक्षण त्यांनी शिमलामधील सेंट एडवर्ड स्कूलमध्ये झाले. बिपिन रावत यांनी भारतीय मिलिटरी अकादमीमध्ये प्रवेश घेतला.

त्यांनतर ते पुन्हा डेहराडूनला आले. त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेण्याचे ठरवले. ते अमेरिकेला गेले, तेथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली. सोबतच त्यांनी हायकमांडचा कोर्सही केला.

सैन्यातील प्रवास

  • लेफ्टनंट जनरल रावत डिसेंबर 1978 मध्ये सैन्यात दाखल झाले.

  • ’11 गोरखा रायफल्स’च्या पाचव्या तुकडीतून त्यांनी लष्करी सेवेला सुरुवात केली.

  • 1986 मध्ये चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर त्यांनी पायदळाची धुरा सांभाळली.

  • 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धानंतर सैन्य दलांमध्ये योग्य समन्वय राखला जावा यासाठी पद निर्माण करण्याची शिफारस करण्यात आली.

  • भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ

  • 31 डिसेंबर 2019 रोजी भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून जनरल बिपिन रावत यांनी कार्यभार स्विकारला.

  • यापूर्वी भारताचे 26 वे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती झालेले रावत सप्टेंबर 2016 मध्ये जबाबदारी स्वीकारली.

  • 2016 मध्ये लष्कराचे उपमुख्याधिकारी म्हणून तोपर्यंत ते कार्यभार पाहत होते.

पुणे येथेही सेवा

त्यापूर्वी ते पुण्यातील सदर्न कमांडचे GOC इन कमांड होते. राष्ट्रीय रायफल्स आणि काश्मीर खोऱ्यात लष्करी तुकडीचे नेतृत्व देखील रावत यांनी केले आहे.

भारतीय लष्करात ब्रिगेडपदी असताना रावत यांनी काँगो येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहिमेच्या बहुराष्ट्रीय ब्रिगेडचे नेतृत्व केले आहे.

बिपिन रावत यांचे अनेक सन्मान

बिपीन रावत यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक आणि सेना पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या