
मुंबई | Mumbai
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका डिझायनर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. डिझायरने अमृता फडणवीसांना १ कोटींची लाच ऑफर केली तसेच धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या तक्रारीनंतर मलबार हिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखला करण्यात आला असून लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनिक्षा जयसिंघानी हिला अटक केली आहे.
अमृता फडणवीस मागच्या १६ महिन्यांपासून अमृता फडणवीस या अनिक्षाला ओळखतात. अमृता फडणवीस यांच्या घरीही अनिक्षा गेली होती.अनिक्षा ही सट्टेबाज अनिल जयसिंघानीची मुलगी आहे. हे सगळं प्रकरण राजकीय आहे का यावर आपण लवकरच भाष्य करू असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आपण जाणून घेऊ की अनिक्षा जयसिंघानी नेमकी कोण आहे?
अनिक्षा जयसिंघानी ही सट्टेबाज अनिल जयसिंघानी यांची मुलगी आहे. अनिलल जयसिंघानीवर महाराष्ट्र, गोवा आणि आसामच्या सरकारी अधिकाऱ्यांना धमक्या देणं, फसवणूक करणं असे गुन्हे नोंद आहेत. अनिक्षाने कायद्याच्या विषयात पदवी घेतली. स्वतःला डिझायनर म्हणवणारी अनिक्षा १६ महिने अमृता फडणवीस यांच्या संपर्कात आहे. अनिक्षा जयसिंघानी ही पेशाने फॅशन डिझायनर आहे. ती कपडे, ज्वेलरी, शूज हे डिझाईन करते.
२०२१ मध्ये अनिक्षाने अमृता फडणवीस यांना ती भेटली होती. तिने फॅशन विश्वातल्या विविध गोष्टी सांगितल्या आणि अमृता फडणवीस यांचा विश्वास संपादन केला. वडिलांना वाचविण्यासाठीच अनिक्षाने अमृता फडणवीस यांच्याशी संपर्क साधला अशी माहिती समोर येत आहे. अमृता फडणवीस यांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार त्यांना अनेक वेळा भेट दिली आणि त्यानंतर पळून गेलेल्या आणि पोलिस अधिकार्यांपासून लपून बसलेल्या तिच्या वडिलांविरुद्धचे पोलीस खटले बंद करण्यासाठी १ कोटींची लाच देण्याची ऑफर दिली.
अनिक्षाचे वडील अनिल जयसिंघानी यांच्यावर सट्टेबाजीचा आरोप आहे. अनिल जयसिंघानी यांचे नाव दीड दशकांपूर्वी चर्चेत होते. त्यावेळी जयसिंघानी यांनी मुंबईचे माजी डीसीपी जाधव, गुन्हे शाखेने त्यांना क्रिकेटवर सट्टा लावायला भाग पाडले आणि कथितरित्या त्यांची मुले आणि पत्नीला ओलीस ठेवले असल्याचा आरोप केला होता. जाधव यांच्यावरील आरोपांची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली नाही.
जाधव यांना रजेवर जाण्यास सांगण्यात आले आणि त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी व्हीआरएस घेतली. अशाप्रकारे जाधव यांनी पोलिस विभाग सोडला. जयसिंघानी यांनी आरोप केला की, डीसीपी अमर जाधव यांना एक कोटी रुपये दिले त्यानंतर त्यांनी ओलीस ठेवलेल्या त्यांच्या कुटुंबाला सोडले. विविध गुन्हात फरार असलेला अनिल जयसिंघानी यांच्यावरील गुन्हे व आरोप मागे घेण्यासाठी जयसिंघानी यांची मुलगी अनिक्षा हिने थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग केल्याचा प्रकार उघड झाला.