Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशWHO ने सांगितले कधी संपणार करोनाचे संकट

WHO ने सांगितले कधी संपणार करोनाचे संकट

लंडन

करोनाचे संकट नेमके कधी संपणार? या प्रश्नाचे उत्तर आता सर्वांना हवे आहे. अखेर या प्रश्नाचे उत्तर जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) प्रमुखांकडूनच देण्यात आले आहे.

- Advertisement -

टेड्रोस एडहोम घेब्येयियस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी दिलेल्या माहितीनुसार,दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत करोनाचे संकट संपणार आहे. आरोग्य आणि अर्थव्यवस्था या दोन गोष्टींचे महत्त्वे आपल्याला ठाऊक झाले आहे. पण करोनामुळे या दोन्ही गोष्टी संकटात आल्या आहेत. करोनाशी दोन हात करण्यासाठी राबवण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या उपायांविषयी त्यांनीप्रशंसा केली. १९१८ मध्ये आलेल्या स्पॅनिश फ्ल्यूच्या साथीचं उदाहरण देत त्यांनी सध्याच्या घडीला हाताशी असणाऱ्या तंत्राची तुलना केली. शिवाय येत्या काळात कोरोना संकटावर मात करण्याची आशाही व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या