करोनावर ‘रेमडेसिवीर’ न वापरण्याचा WHO चा सल्ला

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | Mumbai

करोनावर वापरले जाणारे अँटी-व्हायरल ड्रग रेमडेसिवीरचा (Remdesivir) रुग्णांच्या उपचारासाठी वापर न करण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिला आहे. हे औषध कोरोना बरे होण्यासाठी गुणकारी ठरते, यासंबंधीचा कोणताही पुरावा नाही, असे WHO ने म्हटले आहे.

WHO चे प्रवक्ते तारिक जसारेविक यांनी म्हटले आहे की, “होय आम्ही रेमेडिसविर हे औषध पी.क्यू प्रीक्वालिफिकेशन लिस्टमधून बाद केले आहे. कोरोनावर उपचार करण्यासाठी एकाही देशाने हे औषध खरेदी करु नये.” तसेच ज्या देशांमधील रुग्णालयांमध्ये रेमेडिसविर या औषधाचा वापर केला जातो त्यांनी तो बंद करावा, असेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. सुरुवातीला अनेक देशातील वैज्ञानिकांनी रेमेडिसविर औषध प्रभावी ठरत असल्याचे सांगितले होते. दरम्यान, आज जागतिक आरोग्य संघटनेने रेमेडिसिविर हे औषध कोरोनावर वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या यादीतून बाद केले आहे.

सुरुवातीला इबोला या आजारासाठी रेमडीसीवर औषधाचा वापर केला जात होता. त्यानंतर मे महिन्यात कोरोना रुग्णांच्या उपचारांमध्ये हे औषध प्रभावी ठरत असल्याची माहिती समोर आली होती. यात करोना रुग्णांचा हॉस्पिटलमधील कालावधी १५ दिवसांवरून ११ दिवसांवर येत होता. मात्र, ३० देशांमधील ११ हजाराहून अधिक रूग्णांचा रुग्णालयातील काळ कमी होण्यास किंवा त्यांचा प्राण वाचवण्यासा रेमडेसिवीर औषधाचा फारसा किंवा काहीच उपयोग झाला नाही, असे डब्ल्यूएचओच्या प्रि-प्रिंटमध्ये सांगण्यात आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर देखील उपचार करताना इतर औषधांबरोबर या औषधाचा देखील वापर करण्यात आला होता. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ऑकटोबरमध्ये डोनाल्ड ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *