Thursday, May 9, 2024
Homeमुख्य बातम्या‘मन की बात’मध्ये व्हिसलमॅन पाटील

‘मन की बात’मध्ये व्हिसलमॅन पाटील

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’च्या 100 व्या भागानिमित्त दिल्ली येथे प्रसार भारतीच्या वतीने (दि.26 ते 28 एप्रिल) एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात देशभरातील सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य करणार्‍या मान्यवरांना सन्मानित करण्यात येत आहे.

- Advertisement -

नाशिकचे व्हिसलमॅन म्हणून ओळख असलेले पर्यावरणदूत चंद्रकिशोर पाटील यांनासुद्धा प्रसार भारती कार्यालयाकडून विशेष आमंत्रित करण्यात आले आहे. पाटील यांच्या कार्याचा गौरव मार्च 2022 च्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छाग्रही म्हणून केला होता.

नाशिकमधील गोदावरी नदी, नंदिनी नदी व शहर स्वच्छतेसाठी अनेक वर्षांपासून झटणारे चंद्रकिशोर पाटील हे नाशिकरांनाच नव्हे तर देशभरात व्हिसलमॅन म्हणून परिचित आहेत.दिल्लीमध्ये तीन दिवस आयोजित या कार्यक्रमात ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या 100 व्या भागाचे प्रसारण 30 तारखेला मुंबई येथील राजभवन येथे राज्यपाल व महाराष्ट्रातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या