Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यामोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाच्या मतदानासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून व्हिप जारी

मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाच्या मतदानासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून व्हिप जारी

नवी दिल्ली | New Delhi

सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून विरोधीपक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. दोन दिवस अविश्वास प्रस्तावावर संसदेत चर्चा झाली. त्यानंतर आज या प्रस्तावावर मतदान होणार आहे. अशातच आता या अविश्वास प्रस्तावावरील मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून व्हीप काढण्यात आला आहे. शरद पवार यांच्या गटाकडून मोहम्मद फैझल तर अजित पवार गटाकडून खासदार सुनिल तटकरे यांनी व्हीप जारी केला आहे…

- Advertisement -

पाकिस्तानात मोठी घडामोड! मध्यरात्री संसद बरखास्त, राष्ट्रपतींचा निर्णय

शरद पवारांच्या गटात लोकसभेत सप्रिया सुळे, अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील, मोहम्मद फैझल हे सदस्य आहेत. तर अजित पवार यांच्या गटात सुनिल तटकरे हे एकच सदस्य आहेत. तटकरे यांनी काढलेल्या व्हीपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने मतदान करण्याची सूचना देण्यात आली आहे. तर शरद पवार यांच्या गटाकडून काढण्यात आलेल्या व्हीपमध्ये मोदी सरकार विरोधात मतदान करण्याच्या सूचना देण्यात आली आहे.

RBI कडून नवीन पतधोरण जाहीर; सर्वसामान्यांना महागड्या कर्जातून मोठा दिलासा

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून दोन वेगवेगळे व्हीप जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष नेमक्या कुठल्या व्हीपला अधिकृत मान्यता देतात. यावर पुढच्या कारवाईचे भवितव्य अवलंबून आहे. तसेच राष्ट्रवादीचे खासदार मोदी सरकारच्या बाजूने मतदान करणार की विरोधात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…T

Accident News : देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; चौघांचा मृत्यू, पाच जखमी

- Advertisment -

ताज्या बातम्या