Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याशोकप्रस्तावाच्या भाषणातही मुख्यमंत्र्यांचे भाजपला चिमटे !

शोकप्रस्तावाच्या भाषणातही मुख्यमंत्र्यांचे भाजपला चिमटे !

मुंबई :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत माजी राष्ट्रपती प्रणवदांना श्रद्धांजली अर्पण करताना भाजपचा उल्लेख न करता राजकीय टोले हाणले. त्यामुळे तो विधानभवनात चर्चेचा विषय ठरला.

- Advertisement -

प्रणवदांच्या आठवणींना उजाळा देताना मुख्यमंत्री म्हणाले की,प्रणवदां अजातशत्रू होतेच शिवाय त्यांना राजकारणात राहूनही आपल्या समर्थनार्थ काम केलेल्यांची जाणिव होती. ते भाषणबाजी पेक्षा काम करणारे होते त्यामुळे त्यांनी त्याकाळी सरकारला अनेकदा वाचवल्याने ते संकटमोचक ठरले होते.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत बाळासाहेब ठाकरे यांनी युती असूनही एनडीएमधूनही युपीएच्या प्रणवदांच्या मागे आपली शक्ती उभी केली होती. त्यामुळेच त्यांना निवडणूक जिंकणे शक्य झाले होते. त्यावेळी प्रणवदा शरद पवार यांच्याबरोबर मातोश्रीवर आले होते. आमची तेव्हा पहिली भेट होती मात्र समोरच्याचा आब राखून बोलणे, ऐकून घेणे अशा गोष्टी त्यांच्या स्वभावात पाहायला मिळाल्या.
त्यानंतर ते राष्ट्रपती असतानाही एकदा मुंबईत आले तेव्हा मला खास राजभवनावर बोलावून महापालिका निवडणुकीतील विजयासाठी अभिनंदन केले. ते म्हणाले मला वाटले नव्हते मी राष्ट्रपती होईन, शिवसेनाप्रमुख यांच्यामुळे मी राष्ट्रपती झालो. हे ऋण व्यक्त करण्यासाठी मी तुला भेटत आहे असे त्यांनी सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. नाहीतर काहीजण सत्ता मिळाल्यावर ‘रात गयी बात गयी’, असे वागतात. कोण तुम्ही आणि कोण आम्ही असे ते खुर्ची मिळाल्यावर वागले नाहीत असे म्हणत मुख्यमंत्र्यानी फडणवीस आणि भाजपला टोला लगावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या