Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यामलईदार खाते कोणते? भाजपने सांगावे - नाना पटोले

मलईदार खाते कोणते? भाजपने सांगावे – नाना पटोले

नाशिक । प्रतिनिधी Nashik

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah)यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला (( CM Eknath Shinde Group ) मलाईदार खाती हवी असल्याचे विधान केले. त्यामुळे मलईदार खाती कोणती याचा अर्थ भाजपने महाराष्ट्राला सांगावा, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole)यांनी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यानिमित्त नाशिकमध्ये आले असता पत्रकारांशी संवाद साधताना केली.

- Advertisement -

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर खोटे आरोप लावून सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) कारवाई केली. लोकशाहीसाठी हे घातक आहे. भाजपच्या विरोधात बोलणार्‍या व्यक्तिंविरोधात ईडीची कारवाई होते. पण भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न उपस्थित करत पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

पटोले म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मान्य केले की, हे ईडीचे सरकार आहे. खासदार राऊत यांच्यावर कारवाई म्हणजे दडपशाहीचे काम आहे. भाजपच्या विरोधात बोलणार्‍यांचा आवाज दाबण्याचाच हा प्रकार आहे. इंग्रजांना भारतीय जनतेने पळवून लावले, आता तर लोकशाही असल्याने भारतीय लोक भाजपला नक्कीच धडा शिकवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

.

भाजप नेते शिंदे गटाला मलईदार खाती देणार नाही

भाजप व शिंदे गटाचा मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नाही. त्यावर पटोले म्हणाले की, भाजपचे नेते अमित शहा म्हणतात की, शिंदे गटाला मलईदार खाती कसे देणार? यावरुन त्यांनी सांगावे की, मलईदार खाती म्हणजे काय? या दोघांच्या भांडणात जनता वार्‍यावर पडली आहे. महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला राज्यपालांनी संधी देणे अपेक्षित असताना एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. ते शिवसेनेचे फक्त आमदार आहेत. त्यामुळे त्यांचे मुख्यमंत्रीपद असंवैधानिक असून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. महाराष्ट्रानंतर भाजपचे नेते झारखंडमधील काँग्रेसचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप येथील काँग्रेसचे आमदार यांनी केला आहे. याविरोधात पोलिसांकडे तक्रारही दाखल केल्याचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी सांगितले. ज्या ठिकाणी पैशांचा वापर करुन सत्तांतर घडवणे शक्य होत नाही अशा ठिकाणी ईडीचा वापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या