5G सिम कुठे मिळणार? जाणून घ्या सविस्तर

5G सिम कुठे मिळणार? जाणून घ्या सविस्तर

मुंबई | Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज मोठ्या धुमधडाक्यात इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC 2022) मध्ये रिमोटचे बटण दाबून भारतात 5G इंटरनेट सेवा सुरू केली. पहिल्या टप्प्यात १३ शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात येणार असून यात अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पुणे यांचा समावेश आहे...

5G सेवा सुरू होण्यापूर्वीच 5G स्मार्टफोन बाजारात आले असून सेवा सुरू होताच लोकांना सुपर फास्ट 5G इंटरनेटचा आनंद घेता येणार आहे. परंतु आता 5G नेटवर्क आल्यानंतर 5G सिम कसे उपलब्ध होईल? किंवा ग्राहकांना आधीचा जुना नंबर 5G सिम कार्डवर कसा वापरता येईल. हे जाणून घेणार आहोत.

तसेच 4G सिमच्या आकारात किंवा शेपमध्ये कोणताही बदल केला जाणार नसून ग्राहक कोणत्याही कंपनीचे 4G सिम वापरत असले तरी ते 5G नेटवर्क चालवण्यास सक्षम राहणार आहे. याशिवाय सिममध्ये कोणतेही तंत्रज्ञान नसून सिमद्वारे ग्राहकाला फक्त एकच युनिक आयडी दिला जातो आणि त्या आयडीनुसार ग्राहकाच्या नंबरवर प्लॅन सक्रिय केला जातो. अशा परिस्थितीत ग्राहकांना नवीन सिम घेण्याची गरज भासणार नाही.

तसेच 5G सिम फक्त 5G फोनवरच वापरता येणार आहे. याशिवाय ज्या मोबाईल वापरकर्त्यांनी 5G फोन विकत घेतले त्यांना 5G सिम स्वतंत्रपणे खरेदी करण्याची गरज नसून ग्राहक त्यांच्या 4G सिमवरुन 5G नेटवर्कशी कनेक्ट करू शकतील. तसेच 4G सिम फक्त 5G सिममध्ये रूपांतरित होणार असून त्यात एकाच वेळी 5G इंटरनेट चालवता येणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com