Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशमॉन्सून गेला कुठे ? केव्हा पुनरागमन होणार ?

मॉन्सून गेला कुठे ? केव्हा पुनरागमन होणार ?

नवी दिल्ली :

देशात मॉन्सून (monsoon)दडी मारुन बसला आहे. यामुळे वातावरणातील गारवा संपला असून अनेक ठिकाणी उकाळा जाणवत आहे. राजधानी दिल्लीत 1 जुलै रोजी तापमान 43.5 अंश होते. तब्बल नऊ वर्षांनी जुलैचे तापमान (temperature) उच्चांकावर होते. नैॡत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) वायव्य भारतातील वाटचाल पंधरा दिवसांपासून मंदावली आहे. उत्तर भारतात वेगाने प्रवास करणाऱ्या मॉन्सूनला पुढे सरकण्यास अद्याप पोषक वातावरण नाही. येत्या सात ते आठ दिवस मॉन्सून आणखी रेंगाळणार आहे.

- Advertisement -

गर्भवती महिलांनाही घेता येणार लस; अशी आहे नोंदणी प्रक्रिया

का लागला आहे मॉन्सूनला ब्रेक

भारतात जून ते सप्टेंबर दरम्यान पावसाळा असतो. या दरम्यान मॉन्सून (monsoon) हवांमुळे संपुर्ण देशात पाऊस पडत असतो. या चार महिन्यात एक, दोन आठवडे पाऊस पडत नाही. याला मॉन्सून (monsoon) ब्रेक म्हटले जाते. मॉन्सूनच्या (monsoon) या ब्रेकला वेगवेगळी कारणे आहेत. पश्चिमेत गरम व जोरदार वारे वाहत आहे. ही हवा मॉन्सूनच्या वारे ब्लॉक करत आहे. यामुळे मॉन्सून (monsoon)पुढे जात नाही. आता 7 जुलैपर्यंत देशात असेच वातावरण राहणार आहे. त्यानंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्‌टा तयार होईल. त्यानंतर मॉन्सून (monsoon) पुर्ववत होण्याची अपेक्षा आहे.

गुजरात, मध्य प्रदेशसह देशाच्या बहुतांशी भागात दाखल झाल्यानंतर मॉन्सून (monsoon)वाऱ्यांनी पुढे चाल केली नाही. पुरेसे पोषक हवामान नसल्याने राजधानी दिल्लीसह (New Delhi) देशाच्या वायव्य भागातील मॉन्सूनचे आगमन लांबले आहे. उत्तर भारतात मॉन्सूनचे आगमन रेंगाळले असले तरी देशाच्या बहुतांशी भागात यंदा मॉन्सूनचा (monsoon) प्रवास अधिक वेगाने झाला आहे. जम्मू- काश्मीरसह देशाच्या उत्तर भारतात ३० जूनपर्यंत पोहोचणारा मॉन्सून (monsoon)यंदा १७ दिवस आधीच (१३ जून) या भागात पोहोचला. तर राजस्थानच्या पश्‍चिम भागात ५ जुलैपर्यंत पोहोचणारे मोसमी वारे यंदा १९ जून रोजी दाखल झाले. त्यानंतर वाऱ्यांची वाटचाल झालेली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या