Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याप्रभाग रचना कामाला मुहूर्त कधी?

प्रभाग रचना कामाला मुहूर्त कधी?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

प्रभाग रचना ( Ward Structure )संदर्भात महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाच्या वतीने राज्यातील ज्या महापालिकांच्या मुदत संपून निवडणुका होणार आहेत अशा सर्व महापालिका आयुक्तांना ( NMC Commissioner ) प्रभाग रचना करण्याचे आदेश काढले आहेत. या आदेशात दि.28 डिसेंबर 2021 व 27 जानेवारी 2022 मधील नमूद असलेल्या कार्यपद्धती अनुसार प्रभाग रचना करण्याचे म्हटले आहे. याबाबतचे आदेशित पत्र नाशिक महापालिकेला प्राप्त झाले असले तरी महापालिका प्रशासनाने अद्याप त्याच्यावर काहीच कार्यवाही केली नसल्याचे समजते. दरम्यान, आज(दि.21) सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court )निवडणूकबाबत सुनावणी होणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

राज्याच्या नगर विकास विभागाच्या वतीने राज्यातील ज्या महापालिकांच्या मुदत संपून निवडणुका होणार आहेत अशा सर्व महापालिका आयुक्तांना काढलेल्या आदेशात पुन्हा प्रभाग रचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र त्या आदेशात यामध्ये किती सदस्यीय प्रभाग करायचे, किती तारखेपर्यंत त्याला अंतिम स्वरूप द्यायचे, याबाबत स्पष्ट सूचना नाही. मात्र आदेशात दि. 28 डिसेंबर 21 व 27 जानेवारी 22 च्या संदर्भाचा उल्लेख आहे.

म्हणजेच 28 डिसेंबर 21 ला मुंबई मनपाची प्रभाग रचना 1 या पध्दतीने तर नाशिक मनपाची 3 सदस्यांचा एक प्रभाग या प्रमाणे करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे प्रभाग रचना तयार करून 27 जानेवारी 22 ला प्रभाग रचना पाठविण्यात आली. महापालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे नाशिकमधील 122 नगरसेवक वरून अकरा नगरसेवकांची वाढ करून 133 नगरसेवक म्हणजे त्रिसदस्यीय 43 व चार सदस्याचा एक याप्रमाणे एकूण 44 प्रभागांची प्रभाग रचना तयार करून ती राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे.

ओबीसी आरक्षणावरून सुरू झालेला वाद सुरूच असल्यामुळे जोपर्यंत ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका नाही, असा दावा करण्यात येऊन शासनाने याबाबत विशेष आदेश पारित केला व निवडणूक घेण्याचे अधिकार आपल्या ताब्यात घेतले. त्यानुसार राज्य शासनाने नुकताच महापालिकांच्या आयुक्तांना पुन्हा प्रभाग रचना करण्याच्या सूचना केल्या आहेत.

आरक्षण वाद न्यायालयात असतांना त्यावर आज (दि.21)सुनावणी होणार आहे.या सुनावणीत नव्याने प्रभाग रचनेचा अहवाल काय असू शकतो ,याकडे राजकीय वर्तुळाप्रमाणे इच्छुक उमेदवार,नागरिक यांची नजर लागली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या