महापालिका आयुक्त रिक्षाने प्रवास करतात तेव्हा..

महापालिका आयुक्त रिक्षाने प्रवास करतात तेव्हा..

नाशिक | प्रतिनिधी Nashik

म्हाडा ( MHADA )प्रकरणावरून तडकाफडकी कैलास जाधव यांची बदली करून महापालिका आयुक्त म्हणून मुंबईचे अतिरिक्त आयुक्त असलेले रमेश पवार यांनी पदभार स्वीकारला. पवार यांनी नाशिकचा पदभार स्वीकारल्यानंतर त्वरित अ‍ॅ‍ॅक्शन मोडवर येऊन कामांचा सपाटा लावला तर आज चक्क सुमारे तीन तास रिक्षात प्रवास ( Travel by Auto )करून शहराचा अभ्यास केला. अशाप्रकारे रिक्षाने प्रवास करणारे ते पहिले आयुक्त ठरले आहे.

महापालिकेचे आयुक्त रमेश पवार (Municipal Commissioner Ramesh Pawar )यांनी चक्क रिक्षात बसून तीन तास प्रवास केला. अशाेकस्तंभ,दहीपूल,रामकुंड मालेगाव सटॅंड असा प्रवास करून त्यांनी या भागाची बारकाईने पाहणी केली. यावेळी त्यांना काही विचित्र घटना पहावयास मिळाल्या. शहरात ज्या भागात पर्यटक माेठ्या प्रमाणात येतात,त्या भागात हाॅकर्सचा बेशिस्तपणा त्यांना अधिक आढळून आला.

रस्त्यात कुठेही स्टाॅल लावून विविध वस्तूंची विक्री करणारे विक्रेते पाहून त्यांच्या मनात वेगळीच भावना निर्माण झाली. रामकुंड परिसरात तर एक जण चक्क गादी टाकून बसलेला होता. आपल्याच साम्राज्यात असलेली ती व्यक्ती शांतपणे विडीचे झुरके घेत हाेती. हे दृश्य पाहून त्यांनी त्याला हटकले. तुम्ही काय करतात असे? हे बराेबर नाही असे विचारताच यावर ती व्यक्ती म्हणाली ,‘ साहेब तुम्ही तुमचं काम करा ना’असे बेदारकारपणे उत्तर् ऐकून आयुक्तांनी त्या व्यक्तीचा बेफीकीरीपणा अनुभवला. घेतला. ठिकिठकाणी खाद्यपदार्थ विक्रेत्यांची झालेली गर्दी पाहून त्यांचे मन अस्वस्थ झाले.

पोलीस आयुक्त मदत करणार (The Commissioner of Police will assist )

स्वच्छ सुंदर व स्वस्थ नाशिक कसे होईल? (How to have a clean, beautiful and healthy Nashik? ) अशा विचारत असलेल्या आयुक्तांनी तातडीने पाेलीस आयुक्तांशी चर्चा केली.पाेलीस आयुक्तांनीही असे बेशिस्तशस्त व्यक्ती असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी हवी ती मदत करण्याची तयारी दाखविली.

Related Stories

No stories found.