Video : बैठकीत मोदींनी का फटकारले केजरीवालांना

Video : बैठकीत मोदींनी का फटकारले केजरीवालांना

नवी दिल्ली

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची हाय लेव्हल मीटिंग सुरू झाली आहे. या बैठकीत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे त्रस्त असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना हात जोडले आहे. परंतु हे प्रेक्षपण लाईव्ह सुरु होते. त्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केजरीवाल यांना फटकारले. यावेळी केजरीवालांनी माफी तर मागितली, परंतु त्यानंतर या प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे.

Title Name
मोठी बातमी : कोरोनाच्या या औषधाला मिळाली मंजुरी
Video : बैठकीत मोदींनी का फटकारले केजरीवालांना

केजरीवाल म्हणाले की, ऑक्सिजनचा पुरवठा तर वाढवला आहे, आता हा पुरवठा दिल्लीपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करा. राज्यात आमचे ट्रक रोखले जातात, त्यांना तुम्ही एक फोन करा. केजरीवाल म्हणाले - मुख्यमंत्री असुनही काहीच करु शकत नाहीये. काही वाईट घडले तर आम्ही स्वतःला कधीच माफ करु शकणार नाही.

बैठकीत बोलतांना दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ‘आम्हाला प्रत्येकाचे आयुष्य अनमोल आहे याची हमी लोकांना द्यावी लागेल. आम्ही दिल्लीच्या जनतेच्या वतीने हात जोडून आवाहन करत आहोत की त्वरित पावले उचलली गेली नाहीत तर दिल्लीत मोठी वाईट घटना घडू शकते. मला तुमचे मार्गदर्शन हवे आहे. ऑक्सिजनचे बहुतेक ट्रक अडवले जात आहेत. जर आपण त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन करुन दिला तर ते पुरेसे होईल. मुख्यमंत्री असूनही मी काहीही करू शकलो नाही. काहीही वाईट गोष्ट घडली तर आपण कधीच स्वतःला माफ करु शकणार नाही'

मला दररोज यासाठी फोन येतात. मी काय करावे? मी कोणाला फोन करावा?, असे प्रश्न केजरीवाल यांनी उपस्थित केले. यावेळी केजरीवालांकडून या बैठकीचे थेट प्रक्षेपण सुरू होते. याबद्दल मोदींनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ‘तुमची कृती आपल्या परंपरेच्या, प्रोटोकॉलच्या विरुद्ध आहे. एखाद्या मुख्यमंत्र्यांनी अशा बैठकीचे थेट प्रक्षेपण करणे प्रोटोकॉलला धरून नाही, आपल्याला कायम संयम ठेवायला हवा, असे मोदींनी म्हटले. त्यावेळी केजरीवालांना काहीसा धक्काच बसला. यानंतर केजरीवाल यांनी आपली चूक झाल्याचे म्हटले. 'पुढील वेळेपासून मी याची काळजी घेईन. माझ्याकडून चूक झाली असेल, मी काही कठोरपणे बोललो असेन, तर मी त्यासाठी माफी मागतो,' असे म्हणत केजरीवालांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये हात जोडले.

ऑक्सिजन प्लांट सैन्याकडे द्या

केजरीवाल म्हणाले, ‘राष्ट्रीय योजना बनली पाहिजे. त्याअंतर्गत सरकारने देशातील सर्व ऑक्सिजन प्लांट सैन्याच्या माध्यमातून ताब्यात घ्यावेत. प्रत्येक ट्रकसह सैन्य एस्कॉर्ट वाहन असल्यास, कोणीही ते थांबवू शकणार नाही. 100 टन ऑक्सिजन बंगालच्या ओडिशा येथून येणार आहे. आम्ही त्याला दिल्लीत आणण्याचा प्रयत्न करत आहोत. शक्य असल्यास विमानाने आम्हाला द्या किंवा ऑक्सिजन एक्सप्रेसची कल्पना असल्यास आम्हाला त्यातून ऑक्सिजन मिळेल.' यावर पंतप्रधानांनी केजरीवाल यांना रोखले आणि सांगितले की ऑक्सिजन एक्सप्रेस आधीच सुरू आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com