Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यापायपीट करणार्‍या ग्रामस्थांना बससेवा कधी?

पायपीट करणार्‍या ग्रामस्थांना बससेवा कधी?

म्हाळसाकोरे | कृष्णा अष्टेकर | Mhalsakore

निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) बागलवाडी (Bagalwadi) येथे भारताला स्वातंत्र्य मिळून तब्बल ७५ वर्षे पूर्ण होत असले तरी येथील ग्रामस्थ आजही बससेवेपासून वंचित आहे. येथे बस (Bus) पोहचत नाही हे ऐकून कुणालाही नवल वाटेल. एक काळ असा होता की, ग्रामीण भागातील रस्त्यांवर दळणवळणासाठी बैलगाडी अथवा एसटीशिवाय कुठलेही खासगी वाहन दिसत नव्हते. परंतु, अलीकडच्या गेल्या काही वर्षांपासून रस्त्यांवर आलिशान चारचाकी, दुचाकी वाहनांची रिघ लागलेली पाहायला मिळते…

- Advertisement -

राज्य परिवहन महामंडळाचा (State Transport Corporation) बर्‍याच वर्षापासून एक चांगला नियम आहे ‘गाव तेथे बस. परंतु, आजही महाराष्ट्रातील अनेक खेडी, आदिवासी पाडे आहे जेथे बस जात नाही. सिन्नर व निफाड या दोन्ही तालुक्यांच्या सरद्दीवर असणारे बागलवाडी हे सहाशे लोकसंख्या असणारे गाव. या गावात भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास ७५ वर्षे झाली तरी बससेवा नाही. दहा वर्षांपूर्वी आमदार दिलीप बनकर (MLA Dilip Bankar) यांनी लासलगाव आगाराच्या मदतीने ही बससेवा सायखेडा मार्गे भेंडाळी, बागलवाडी अशी सुरू केली होती. परंतु, ती काही दिवसात रस्त्याच्या कारणाअभावी बंद झाली.

निफाड तालुक्यात लासलगाव व पिंपळगाव बसवंत हे दोन आगार आहे. शाळेतील लहान मुलांना भेंडाळी येथे जाण्यासाठी चार ते पाच किलोमीटर पायपीट करावी लागते. तर विद्यार्थ्यांना सायखेडा व नाशिककडे (Nashik) जाण्यासाठी भेंडाळीतून पुढे सायखेडा जाण्यासाठी प्रवासी काळी पिवळी व्हॅन किंवा रिक्षाने प्रवास करावा लागतो. तर म्हाळसाकोरे, सिन्नर अथवा निफाडला जाण्यासाठी सिन्नर, निफाड या रस्त्यावर यायला देखील विद्यार्थी, वयोवृद्ध ग्रामस्थांना चार ते पाच किलोमीटर अंतर पायी चालत यावे लागते.

यात शालेय विद्यार्थी व वयोवृद्ध व्यक्तींना यामुळे त्रास सहन करावा लागतो. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेळेवर पोहोचता येत नाही. तालुक्याच्या गावी असणारी सरकारी कामे, किराणा बाजार, आठवडे बाजारात जाण्यासाठी पायपीट करत मनःस्ताप सहन करावा लागतो. बागलवाडी गावाला बससेवा मिळावी, अशी मागणी येथील विद्यार्थी व ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे केली आहे.

तालुक्यात दोन आगार, बससेवेपासून मात्र माघार

सुजलाम् सुफलाम् व कृषीप्रधान असणार्‍या निफाड तालुक्यात पिंपळगाव बसवंत व लासलगाव ही दोन आगार आहे. निफाड तालुक्यातील दक्षिण भागातील हे गाव असून, सिन्नर व निफाड या सरहद्दीवर आहे. तर जवळच सिन्नर आगार हे तिसरे आगार आहे. मात्र, तालुक्यात आगार असूनही बस सेवा मिळत नाही. त्यामुळे येथील नागरिक लोकप्रतिनिधींवर नाराज आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या