...जेव्हा पाच महिन्यांनी लालपरीचे गावात आगमन होते

बस
बस digi

पुनदखोरे | वार्ताहर Punadkhore

करोना विषाणूच्या पाश्र्वभूमीवर सुमारे पाच महीन्यांपासुन राज्य परीवहन महामंडळाची बस थांबली होती. कळवण तालुक्यातील प्रवाशांच्या मागणी वरून कळवण ते नाशिक बससेवा.सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.

सुमारे पाच महीन्यांपासून थांबलेली बस नुकतीच सुरु करण्यात आली. कळवण ते नाशिक बसचे वेळापत्रक सकाळी .७.३० व दूपारी ३ .१५ असे असुन, नासिक महामार्गावरून सकाळी १०.०० व सांयकाळी ५ .१५ . वाजता परतीचा प्रवास ठेवण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे सुरगाण्यासाठी सकाळी ८.०० , वाजता १ बस , तसेच देवळा येथे सकाळी ६ .४५ , १०.०० , १० .१५ व दुपारी २.४५ अशी वेळ ठेवण्यात आली आहे.

तसेच तालुक्यातीलच मुळाणे येथे सकाळी ८.३० व दुपारी ४ .०० तर बेज येथे सकाळी ११ .३० वाजता बस धावणार असल्याची माहीती कळवणचे आगार व्यवस्थापक , एच .एस .पगार व वाहतूक निरीक्षक सुरेश पवार यांनी दिली.

दरम्यान करोनाचा हॉट स्पॉट बनलेल्या नाशिक व मालेगावात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस व्दारे प्रवाशांना मनाई करण्यात आली होती.

त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी अहोरात्र धावणाऱ्या लालपरीची चाके थांबली होती, मात्र राज्य शासनाच्या वतीने जिल्हा प्रवाशी वाहतूकीस एस .टी . महामंडळाला परवानगी देण्यात आली आहे.

पंरतु मालेगाव येथे मात्र अद्यापही बससेवा सुरू करण्यात आलेली नाही. करोनाच्या पाश्र्वभुमीवर ज्येष्ट नागरीक व १२ वर्षाखालील मुलांना प्रवेश नसून मास्क व सॅनेटायझर चा वापर करून ५० टक्के प्रवाशांना परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे आपत्कालिन फेऱ्यांच्या मंजुरीसाठी विभागीय कार्यालय नाशिक यांच्याकडे मागणी करण्यात आली असल्याची माहीती वाहतूक निरीक्षक सुरेश पवार यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com