Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यारखडलेल्या निवडणुका कधी?, आयोगाने दिले 'हे' संकेत

रखडलेल्या निवडणुका कधी?, आयोगाने दिले ‘हे’ संकेत

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

सर्वोच्च नायायालयाच्या निर्देशानंतरही (Directions of the Supreme Court )राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ( Local Body Elections in the state ) या पावसाळ्यानंतरच ( After Rainy Season )म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये होण्याचे संकेत राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी दिले.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाने जास्त पाऊस पडण्याची शक्यता असलेल्या भागात पावसाळ्यानंतर तर अन्यत्र पावसाळ्यात निवडणूक घेण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र अशा प्रकारे निवडणुका घेताना हवामान खाते (Meteorological Department )आणि स्थानिक प्रशासन यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घ्यायचा आहे, अशी माहिती आयोगाच्या सूत्रांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाने मुंबई आणि कोकण विभागातील निवडणुका या पावसाळ्यानंतर घ्याव्यात, तर अन्यत्र पावसाळ्यात निवडणूक घेता येणे शक्य असेल तर त्यादृष्टीने कार्यक्रम ठरवावा, असे निर्देश दिले आहेत. मात्र मतदारयाद्यांचे प्रभागनिहाय विभाजन तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला आरक्षण ही निवडणूकपूर्व प्रक्रिया संपण्यासाठी जुलै अखेरपर्यंत पूर्ण होऊ शकते.

महानगर पालिकांचे निवडणूकपूर्व काम जून अखेरपर्यंत संपणार आहे तर जिल्हा परिषदा आणि नगर पंचायती आणि नगर परिषदा यांची निवडणूक प्रक्रिया जुलै अखेरपर्यंत संपणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करता येणे शक्य नसल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस. मदान यांनी आज स्पष्ट केले.

निवडणुका लवकरात लवकर घ्याव्यात असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे दिले असले तरीही अंतिम निर्णय निवडणूक आयोगाला स्थानिक परिस्थिती पाहूनच घ्यावा लागणार आहे. त्यासाठी हवामान खात्याकडून मिळालेल्या पावसाच्या अंदाजानुसार तसेच स्थानिक प्रशासनाकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारेच निवडणुका घेण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे, असे मदान यांनी सांगितले.

स्थानिक परिस्थिती पाहून निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असल्याने पावसाची तीव्रता आणि त्याबाबतचा अंदाज याच्या आधारेच निवडणुकीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, याकडे मदान यांनी लक्ष वेधले.

राज्यातील १४ महापालिका, २५ जिल्हा परिषद, २८४ पंचायत समित्या आणि २२० नगर पालिका आणि नगर पंचायती यांच्या मुदत संपल्याने त्यांच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत.

निवडणूक होऊ घातलेल्या महापालिका

नाशिक, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, वसई-विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, अकोला, सोलापूर

निवडणूक होऊ घातलेल्या जिल्हा परिषदा

नाशिक, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, वसई-विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, अकोला, सोलापूर

- Advertisment -

ताज्या बातम्या