
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
जळगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या पतीला जेवणाचा डबा घेऊन जातांना पत्नीला (wife) घराजवळील काही अंतरावर रुग्णवाहिकेने (ambulance) जोरदार धडक दिली. या अपघातात तिचा जागीच मृत्यू (death) झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता कुसुंबा गावात घडली. संगीता कैलास पाटील (वय 48 वर्ष, रा. कुसुंबा ता. जि. जळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. एकीकडे पती रुग्णालयात तर दुसरीकडे पत्नीचा असा दुर्देवी मृत्यू झाल्याच्या घटनेमूळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्याच रुग्णवाहिकेने मृतदेह रुग्णालयात नेला
संगीता पाटील यांचा ज्या रुग्णवाहिकेने धडक दिली. त्याच रुग्णवाहिकेतून त्यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. या ठिकाणी तपासणीअंती वैद्यकीय अधिकारी यांनी संगीता यांना मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
डोळ्यादेखत सुनेचा मृत्यू
सासूबाई इंदूबाई यांच्या सोबत संगीता पाटील या पतीला जेवणाचा डबा देण्यासाठी घरून निघाल्या. पण काही अंतारावच डोळ्यादेखत सुनेला रुग्णवाहिकेने धडक दिली. एकीकडे मुलगा दवाखान्यात तर दुसरीकडे सूनबाईचा मृत्यू झाल्याने इंदुबाई यांना मोठा धक्का बसला आहे. मयत संगीता पाटील यांच्या पश्चात पती, एक मुलगा शुभम, सून, सासू आणि नम्रता व तेजस्विनी अशा दोन विवाहित मुली असा परिवार आहे.