लग्नात हरवलेली दोन तोळ्याची पोत सापडते तेव्हा...

लग्नात हरवलेली दोन तोळ्याची पोत सापडते तेव्हा...

नाशिक | प्रतिनिधी | Nashik  

आजच्या काळात एकदा हरवलेली वस्तू परत मिळणं अतिशय दुरापास्त, त्यातही पैसे, सोन्याचे दागिने (Gold ornaments) हरवल्यास परत मिळण्याची शक्यता धूसर असते आणि मनस्ताप करण्याशिवाय पर्याय नसतो; मात्र या काळातही माणुसकीचे दर्शन घडविणारे काही उदाहरणे बघायला मिळतात.

लाहूरी-पांढुर्ली मार्गावर चव्हाण आणि वीर कटुबियांच्या लग्नसोहळ्यामध्ये रजनी झनकर-भरवीर या शिक्षक महिलेची दोन तोळ्यांची सोन्याची पोत तुटून पडली. सुदैवाने ती पोत नायगावचे पोलीस पाटील (Police Patil) अरुण बोडके आणि आगासखिंडचे सरपंच लहानू नरकुळे यांना सापडली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

त्यांनी लग्न मंडपात ध्वनीक्षेपकावरुन (Speaker) अनेकदा उद्घोषणा केली, ओळख पटवून पोत घेवून जाण्याचेही आवाहन केले. मात्र, पोत घेण्यास कोणीच आले नाही. त्यांनी ती आपल्याचकडे सुरक्षित ठेवली. ज्या महिलेची पोत हरवली होती.

लग्नात हरवलेली दोन तोळ्याची पोत सापडते तेव्हा...
गिरीश महाजनांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, अनिल देशमुखांना...

दुस-या दिवशी ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ लग्नघर गाठून आपबिती कथन केल्यानंतर आपली पोत नायगावचे पोलीस पाटील अरुन बोडके यांच्याकडे सुरक्षितअसल्याचे समजल्याने त्यांचा जीव भांड्यात पडला. बोडके यांनी सदर महिलेची भेट घेवून सापडलेली पोत सुखरुप परत केली. सदर महिलेने पत्र लिहून त्यांचे आभार व्यक्त केले. 

आजच्या काळात रस्त्यावर सापडलेले रुपयाचे नाणे माणूस जपून ठेवतो, ही तर दोन तोळ्याची सोन्याई पोत होती. बोडके यांनी दाखविलेल्या औदार्यामुळे झनकर कुटुंबाचे अलंकार परत मिळाला. नातीच्या लग्नात हरवलेली दोन तोळ्यांची पोत अशाच दोन प्रामाणिक माणसांमुळे सापडली. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com