Saturday, April 27, 2024
Homeजळगाव90 डब्यांची मालगाडी चक्क गायब होते तेव्हा...!

90 डब्यांची मालगाडी चक्क गायब होते तेव्हा…!

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

प्रवासी वाहतुक असो किंवा माल वाहतुकीसाठी सुरक्षित साधन म्हणजे रेल्वे आहे. मात्र रेल्वे मार्गावरुन चक्क 90 कंटेनर भरुन नागपूर ते मुंबई जाणारी रेल्वेची मालगाडी (freight train) तब्बल 14 दिवस बेपत्ता (disappears) झाली होती. खर तर मालगाडी बेपत्ता होणे शक्य नसले तरी रेल्वे प्रशासनाच्या दरबारी ती बेपत्ताच असल्याचे आढळून आले आहे. अखेर 15 रोजी ही गाडी भुसावळ विभागातील शेगाव स्थानकावरुन जे.एन.पी.टी. मुंबईकडे रवाना करण्यात आली. दरम्यान, 15 दिवस रेल्वे गाडीचा थांग पत्ता लागत नसल्याने रेल्वेच्या वाहतुक व सुरक्षिततेबाबत ही प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisement -

Makeup Part 4 # असा करा Self makeup

मिळालेल्या माहितीनुसार, मिहान नागपूर येथून दि.1 फेब्रुवारी रोजी 1040201 पीजे टी ही 90 डब्यांची (कंटेनर) मालगाडी चार तारखेपर्यंत मुंबई येथील जेएनपीटी बंदरात पोहचणे अपेक्षित होते. मात्र 14 तारखेपर्यंत या गाडीचे लोकेशन मिळून येत नव्हते. या गाडीमध्ये उच्च प्रतिचा गहू व अन्य मौल्यवान वस्तु असा सुमारे 125 कोटी रूपयांचा माल होता. तेरा दिवस उलटले तरी गाडी मुंबई बंदरात न आल्याने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी शोधाशोध सुरू केली. प्रत्येक गाडीचे रिअल टाईम लोकेशन घेतले जाते. गाडीची सर्व स्थिती फ्रंट ऑपरेशन सिस्टिमला असते. रेल्वेकडे लाईव्ह मॉनेटरिंगची देखील यंत्रणा असते. मात्र या लोकेशनवरूनही ही गाडी अदृष्य झाली आहे. हे विशेष. सदरची गाडी तेरा दिवसानंतर भुसावळ विभागातील शेगाव स्थानकाच्या जवळ आढळली. ती गाडी 14 रोजी 5.40 वा. मुंबई बंदराकडे रवाना झाली. गाडी बेपत्ता होण्याची ही पहिलीच वेळ असून रेल्वे अधिकार्‍यांनी याबाबत कमालीची गुप्तता पाळली होती.

नागपूरकडून जेएनपीटी मुंबई कडे निघालेली रेल्वे मालगाडी पीजेटी 1040201 क्रमांकाच्या मालगाडीला 90 कंटेनर आहे. यात उच्च प्रतीचा तांदूळ, कागद, प्लास्टिकच्या वस्तू, केमिकल्स आणि इतर निर्यात करण्याच्या वस्तू आहेत. ही गाडी 1 फेब्रुवारी रोजी ही नागपूरकडून मुंबईकडे रवाना झाली होती. रेल्वेतर्फे प्रत्येक मालगाडीचे रिअल टाईम लोकशन घेतले जाते. हे लोकेशन भारतीय रेल्वेच्या फ्रेट ऑपरेशन इन्फॉर्मेशन सिस्टीम एफओआयएस मधून घेतले जाते. भारतीय रेल्वेच्या फ्रेट ऑपरेशन इन्फॉर्मेशन सिस्टीम एफओआयएस. मधून अदृश्य झाले होते. एफओआयएस ही रेल्वे डब्यांना लाइव मॉनिटर करण्याची भारतीय रेल्वेची यंत्रणा आहे. मात्र एफओआयएस मधून या गाडीचे लोकेशन अदृश्य झाले होते. दरम्यान एक नवखा अधिकारी आणि प्रशासनाचा भोंगळ कारभारामुळे हा प्रकार घडला.

दरम्यान,14 दिवस सव्वाशे करोड रुपयांचा मुद्देमाल असलेली रेल्वे गाडी रेल्वे मार्गावरच अचानक कशी गायब होते. अशाच प्रकारे प्रवासी वाहतूक करणारी रेल्वे गाडी बेपत्ता झाली तर काय वितरित स्थिती निर्माण होऊ शकते.

नागपूर येथून रवाना झालेली मालवाहतूक गाडीचे लोकेशन तब्बल 14 दिवस मिळत नव्हते. तसेच रेल्वने मार्गात शेगावजवळ ही गाडी आढळून आली. यानंतर प्रश्न उपस्थित होतो की. रेल्वेकडे अद्ययावत सिग्नलिंग यंत्रणा आहे. शिवाय विविध प्रकारची अद्ययावत साधने रेल्वे विभागाकडे असतांना गाडीचे लोकेशन जातेच कसे असा सवाल उपस्थित होत आहे.

शिवायत नागपूर येथून गाडी रवाना झाल्यानंतर गाडीचे लोकोपायलट, साहाय्यक लोको पायलट गाडीचे गार्ड यांनी गाडी रस्त्यात मध्येच कशी उभी केली. तसेच गाडी सोडतांना कुठला कर्मचारी किंवा अधिकारी यांच्याकडे ड्युटी हँड ओव्हर केली? तसेच साधारण दीड किमी लांब असलेल्या या गाडीचे रेल्वे विभागाकडे लोकेशन नाही.

अशातच दिवसभर वाहणार्‍यार नागपूर-भुसावळ-मुंबई मार्गावरील एखादी गाडी या मालगाडीवर सुदैवाने धडकली नाही. अन्यथा मोठा अनर्थ होऊ शकला असता. अशा गंभीर बाबींकडे अधिकारी, कर्मचारी, सिग्नल यंत्रेणेने कसे दुर्लक्ष केले. संबंधित स्टेशन मास्तरांच्या लक्षात 14 दिवस ही बाब येवू नये इतका बिनधास्तव व गोंधळाचा कारभार रेल्वेत कसा काय चालू शकतो असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकारामुळे रेल्वेच्या सुरक्षिततेवर ही प्रश्न उपस्थित होत आहे.

गाडी गंतव्य स्थानावर वेळेवर न पोहोचल्याने व्यापार्‍यांकडून होत असलेल्या चौकशी नंतर ही 10-12 दिवसात या अज्ञात ठिकाणी उभ्या असलेल्या 90 कंटेनर मालगाडीची कोणी चौकशी ही का केली नाही. या प्रकारामुळे संबंधित कंपनी व व्यापार्‍यांना वेळेवर माल न मिळाल्याने होणार्‍या नुकसानाची भरपाई रेल्वे प्रशासन देणार आहेत का? किंवा याबाबत कामात हलगर्जी करणार्‍या कर्मचार्‍यांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या