Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याआजपासून WhatsApp ने पाठवा पैसे

आजपासून WhatsApp ने पाठवा पैसे

नवी दिल्लीः

WhatsApp UPI Payment ने भारतात पैसे ट्रान्सफर करता येणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने गुरूवार WhatsApp ला पैसे ट्रान्सफर करण्यास मंजुरी दिली आहे.

- Advertisement -

प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर गेल्या काही दिवसांपासून आपली पेमेंट सर्विस Whatsapp Pay ची टेस्टिंग केली जात होती. २०१८ मध्ये बीटा युजर्ससोबत सुरू झालेली ही टेस्टिंग नंतर आता हे फीचर सर्व युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे. याच्या मदतीने युजर्स चॅटिंग करताना या प्लॅटफॉर्मवर पेमेंट सुद्धा करू शकणार आहेत.

भारतात WhatsApp Payment दाहा क्षेत्रीय भाषेत उपलब्ध आहे. जर तुमच्या WhatsApp अँपमध्ये आधीपासून पेमेंट ऑप्शन असेल तर पैसे पाठवू शकता. नाहीतर WhatsApp अपडेट करुन घ्यावे लागणार आहे.

व्हॉट्सअॅपला पेमेंट सर्विसला परवानगी मिळाली असली तरी एक मर्यादा लावण्यात आली आहे. Whatsapp Pay च्या फर्स्ट सेगमेंट मध्ये NPCI ने २ कोटी युजर्सला एक कॅप सेट केले आहे. म्हणजेच युजर्सला आता व्हॉट्सअँपचे पेमेंट फीचर युज करण्याचा ऑप्शन मिळणार आहे.

भारतात व्हॉट्सअँपचे युजरबेस जवळपास ४० कोटी युजर्सचा आहे. अँपचे लेटेस्ट व्हर्जनवर iOS आणि Android यूजर्स याचा वापर करु शकतील. यासाठी व्हॉट्सअँप युजर्ससाठी कोणत्याही यूपीआय सपोर्टेड बँकेचे डेबिट कार्ड असणे गरजेचे आहे. व्हॉट्सअँपने आपल्या पेमेंट सिस्टमची टेस्टिंग फेब्रुवारी २०१८ मध्ये सुरू केली होती

- Advertisment -

ताज्या बातम्या