
मुंबई | Mumbai
जगभर प्रचंड लोकप्रिय असलेले व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे वापरकर्त्यांसाठी (Users) नवीन फीचर्स लॉन्च करत असते. त्यामुळे वापरकर्ते देखील व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचर्सची तितक्याच आतुरतेने वाट पाहत असतात. अशातच आता व्हॉट्सअॅपने पुन्हा एकदा वापरकर्त्यांसाठी तीन नवीन फीचर्स लॉन्च केले असून त्यामुळे अनेक गोष्टी सोप्या होणार आहेत...
व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांसाठी डॉक्युमेंट कॅप्शन (Document Caption) हे नवीन फीचर आणले आहे. यासोबतच एक मोठा ग्रुप सब्जेक्ट आणि डिस्क्रिप्शन फीचर्स देण्यात आले आहे. म्हणजे, एखादे डॉक्युमेंट शेअर करण्यापूर्वी वापरकर्ते संबंधित माहिती देऊ शकतील.
तसेच व्हॉट्सअॅपने मीडिया फाईल शेअरिंगचा (Media File Sharing) पर्याय देखील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. ज्याच्या मदतीने युजर्स एकाच वेळी १०० मीडिया फाइल्स शेअर करू शकतात. याशिवाय फाईल शेअरिंगच्या मदतीने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मोठ्या फाइल्स सहज शेअर करता येतात. यापूर्वी एकाच वेळी ३० मीडिया फाइल्स पाठवता येत होत्या.
याशिवाय व्हॉट्सअॅपने अवतार (Avatar Feature) हे देखील एक नवीन फीचर्स आणले आहे. ज्याद्वारे वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅपवर अवतार आणि कॅरेक्टर स्टाईलसह उत्तर देता येईल. याबरोबरच प्रोफाईल फोटोमध्ये वापरकर्ते अवतार किंवा स्टिकर्स लावू शकणार आहेत. तसेच हे फीचर्स वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅपचे लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर व्हॉट्सअॅप गुगल प्ले स्टोअरवर देखील उपलब्ध आहे.