
नवी दिल्ली | New Delhi
व्हॉट्सअॅप'च्या कंपनीने एक नवीन फिचर सादर केले असून या फिचरमुळे व्हॉट्सअॅप (WhatsApp) वापरकर्त्यांना ग्रुप कॉलिंगचा (Group Calling) अनुभव आणखी मजेदार घेता येणार आहे. या नवीन फिचरमुळे आता व्हॉट्सअॅप'वर एकाचवेळी तब्बल ३१ युजर्सचा ग्रुप कॉलिंगमध्ये समावेश करता येणार आहे...
WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप कॉल (WhatsApp Call) टॅबमध्ये काही बदल करण्यात आलेले असून त्यातून ३१ युजर्सना एकाचवेळी कॉल करण्याची सुविधा मिळणार आहे. व्हॉट्सअॅपने याचे अँड्रॉईड बीटा अपडेट जारी केलेले आहे. ते २.२३.१९.१६ व्हर्जनमध्ये अॅक्सेस केले जाऊ शकते.
दरम्यान, या अगोदर व्हॉट्सअॅपवर जास्तीत जास्त १५ लोकांसोबत ग्रुप कॉल करता येऊ शकत होता. त्यापूर्वी केवळ सात लोकांना एकाचवेळी कॉलिंगची सुविधा होती. आता मात्र ३१ जण एकाचवेळी व्हॉट्सअॅप कॉल करु शकणार आहेत. मित्रांचा एक मोठा ग्रुप या फिचरमुळे ऑनलाईन व्हिडीओ (Online Video) कॉलद्वारे कनेक्ट होऊ शकतो.
व्हॉट्सअॅपचे नवे चॅनेल
व्हॉट्सअॅपने अलिकडेच व्हॉट्सअॅप चॅनेल (Whatsapp Channel) फिचर आणले आहे. कोणताही युजर याद्वारे स्वतःचे चॅनेल सुरु करु शकतो. हे एक ब्रॉडकास्टिंग चॅनेल असून याद्वारे मोठ्या संख्येच्या ग्रुपला अपडेट्स पुरवता येणार आहेत. १५० पेक्षा जास्त देशांमध्ये व्हॉट्सअॅपने चॅनेल फिचर लाईव्ह केले आहे.