Union Budget 2023 for Farmers: शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये झाल्या 'या' मोठ्या घोषणा, जाणून घ्या कृषी क्षेत्राला काय मिळाले...

Union Budget 2023 for Farmers: शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये झाल्या 'या' मोठ्या घोषणा, जाणून घ्या कृषी क्षेत्राला काय मिळाले...

दिल्ली | Delhi

अर्थमंत्री निर्मला सीतारमण (finance minister Nirmala Sitharaman) यांनी आज देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2023) सादर केला. यात त्यांनी शेतकऱ्यांशी (farmers) संबंधित अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा करण्यात आल्या, याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.

भारताला बाजरींचे जागतिक केंद्र बनविण्यावर भर देण्यात येणार आहे. तृणधान्यांसाठी ग्लोबल हब तयार करण्यात येणार आहे. देशातील शेतकऱ्यांसाठी डिजीटल प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार आहे.

सीतारामण यांनी सांगितले की, कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन निधीची घोषणा करण्यात आली आहे. हा निधी आधुनिक तंत्रज्ञानासाठी वापरला जाणार आहे.कापसावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. कापसातून जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

यासोबतच त्या म्हणाल्या की, पारंपारिक पद्धतीचे जे पदार्थ आपल्या रोजच्या जेवणात असतात त्यांना ग्लोबल करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. तरुण उद्योजकांद्वारे कृषी-स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी अॅग्रीकल्चर एक्सीलरेटर फंड तयार केला जाईल. अशा घोषणा करण्यात आल्या आहेत.

हैदराबादमधील श्रीअन्न संशोधन संस्थेला केंद्र सरकारकडून विशेष आर्थिक मदत केली जाणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलं. ६३ हजार प्राथमिक कृषी क्रेडिट सोसायट्यांचं संगणकीकरण करण्यात आलं आहे.

राष्ट्रीय सहकार डेटाबेस तयार करण्यात आहे. आता देशभरात मोठ्या प्रमाणावर विकेंद्रीत स्टोरेज सुविधा निर्माण करण्यात येतील असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.

शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आयुष, मत्स्य, पशुपालन, डेअरी, सहकार अशा मंत्रालयांची स्थापना केल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितलं. मत्स्य विकासासाठी ६ हजार कोटींची विशेष तरतूद करण्यात आली आहे.

बातमी अपडेट होत आहे, रिफ्रेश करा....

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com