राज्यात काय असणार पावसाचा अंदाज ? वाचा सविस्तर

राज्यात काय असणार पावसाचा अंदाज ? वाचा सविस्तर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

खान्देश, नाशिकपासून ते सांगली, सोलापूरपर्यंतच्या 10 जिल्ह्यात व विदर्भातील सर्व जिल्ह्यात शुक्रवार दि.14 जुलैपासून पुढील 4-5 दिवस म्हणजे सोमवार दि.17 जुलैपर्यन्त मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज पुणे वेधशाळेचे निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे.

कोकणात चालू असलेल्या पावसाची तीव्रता तशीच टिकून राहील. महाराष्ट्रात आतापर्यंत भाग बदलत झालेल्या पावसामुळे 8 इंचापर्यंतच्या पूर्ण ओलीवर सोयाबीनची पेरणी झाली असून काही ठिकाणी सध्या पेरणी चालू आहे. जेथे खास ओल नाही तेथे पेरणीसाठी वाट पाहण्याचा काळ जरी अंतिम टप्प्यात असला तरी अजुनही वाट पाहण्यास तेथे वाव आहे, असे वाटते.

शिवाय त्यानंतरही 21 जुलैपासून पावसाच्या शक्यतेमुळे पूर्ण पेर ओलीसाठी वाट पहावीच, असे वाटते. बद्री-केदारनाथ येथे अजुन किमान आठवडाभर पावसाचा धुमाकूळ असू शकतो. त्यानंतर त्यापुढील 15-20 दिवसापर्यंत तेथील जनजीवन पूर्वपदावर येण्यास काळ लोटला जाईल, असेही माणिकराव खुळे यांनी सांगितले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com